वसई : राज्यात हिट अँड रन चा मुद्दा ताजा असतानाच आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वसई येथे एका तरुणाने पान्ह्याने तरुणीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (१८ जून) सकाळी घडली. या हल्ल्यात पिडीत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आरती असे पिडीत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांपासून हे तरुण तरुणी प्रेमसंबंध होते. पण त्यांच्यात नुकतेच ब्रेकअप झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात तरुणांने संबंधित तरुणीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला. 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आरोपी तरुणीवर हल्ला करताना दिसत आहे. तसेच “तू असे का केलेस, तू माझ्यासोबत असे का केलेस,” असेही ओरडताना दिसत आहे.
#watchthefullvideo of Vasai girlfriend murder by her lover.
You will be mentally disturbed after watching the video of this horrific incident.#MUMBAI #MumbaiNews #News #Crime #CrimeCase #Vasai #girlfriendmurder #cctvfootage https://t.co/R8Gc7bEyJ1 pic.twitter.com/6i1hrl7Y3B
— Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) June 18, 2024
हल्ला करण्याच्या दरम्यान एक व्यक्ती हस्तक्षेप करताना दिसते पण तरुणाने तिच्यावर वार करणे चालूच ठेवले. तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली पण तरीही तो वार करतच राहिला. दुर्दैवाने, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी जाणाऱ्या वाहनचालकांनीही प्रयत्न केले नाहीत. स्थानिक पोलिसांनी रोहित यादव नावाच्या आरोपीला तात्काळ अटक केली. बघ्याची भूमिका घेणाऱ्यांनी थोडे प्रयत्न केले असते तर तरूणी वाचली असती, असे पोलिसांनी म्हटले आहे.