Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: साखरपुडा झालेल्या तरुणाचा लॉजमध्ये मृत्यू; अल्पवयीन प्रेयसी बचावली, प्रकरणात नवा ट्विस्ट

जळगावच्या पाचोरा येथील एका लॉजमध्ये 25 वर्षीय व्यावसायिक रवींद्र मोरे याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तपासात तो आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. प्रेयसी बचावली असून तिच्यासह लॉज मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 01:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पाचोरा येथील लॉजमध्ये रवींद्र मोरे याचा मृत्यू, अल्पवयीन प्रेयसीचा जीव वाचला.
  • प्रेयसी, लॉज मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.
  • नातेवाईकांनी संशय व्यक्त करत आंदोलन केले; पोलिसांनी निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले.
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये तरुण व्यवसायिक आणि त्याच्या प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेत २५ वर्षीय रवींद्र मोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट समोर आलाय.

संतापजनक! केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

काय नेमकं प्रकरण?

रवींद्र मोरे यांचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला होता, अशा स्थितीत त्यांनी आणि त्यांच्या प्रेयसीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र पोलिसांनी आता रवींद्रच्या प्रेयसी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ प्रेयसीच नव्हे तर संबंधित लॉजचे मालक सुरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

नातेवाईकांचा संताप आणि तीव्र आंदोलन

रवींद्र मोरे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच तीव्र संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस झालेला विलंब यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि नागरिकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर, शेकडो आंदोलकांचा मोर्चा थेट पाचोरा पोलीस ठाण्यावर धडकला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, आंदोलकांनी जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला. पोलीस प्रशासनाने लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर आणि या प्रकरणाच्या निष्पक्षपाती तपासाचे आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

कार धुताना विजेचा बसला जोरदार झटका; तरुणाचा जागीच मृत्यू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: रवींद्र मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात नेमके काय समोर आले?

    Ans: रवींद्र मोरे आणि त्यांच्या अल्पवयीन प्रेयसीने लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले.

  • Que: या प्रकरणात कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

    Ans: अल्पवयीन प्रेयसी, लॉज मालक सुरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: नातेवाईकांनी आंदोलन का केले?

    Ans: गुन्हा दाखल करण्यास झालेला विलंब आणि मृत्यूबाबत संशय व्यक्त करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन केले.

Web Title: Jalgaon crime death in taruncha lodge in sakharpura underage lover rescued new twist in the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
2

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
3

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड
4

Sugar and Jaggery Prices Fall: दरवाढीनंतर अचानक मोठा दिलासा! साखर-गुळाच्या भावात घसरणीचा नवा ट्रेंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.