जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका ६ वर्षीय हनन खान याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत शेजारच्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हनन खान हा शुक्रवारच्या सायंकाळपासून बेपत्ता होता आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या घरात सापडल्याने आता शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नागरिकांत संतापाची लाट
मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे, हननच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली असून, संपूर्ण बाबूजी पुरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक संशयित ताब्यात
या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यावेळी पोलीस अधीक्षकानी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून,त्याची चौकशी सुरु आहे. बालकाच्या मृत्यूचे कारण उघड होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
शांततेचे आवाहन
पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
पत्नी माहेरी जाताना दाम्पत्यामध्ये वाद; नंतर मृतदेहच आढळल्याने नातेवाईकांना धक्का
पतीसोबतच्या रोजच्या भांडणांना कंटाळून माहेरी निघून गेलेल्या एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार हत्येच्या संदर्भात असल्याने मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून महिलेच्या पतीस संशियत आरोपी म्हणून कोटगूल पोलिसांनी अटक केली आहे.
पुरुषोत्तम गजराज कचलम (वय ३७, रा. सोनपूर) असे अटकेतील संशयित आरोपी पतीचे नाव असून, तामिनाबाई पुरुषोत्तम काचलम (वय ३४) असे हत्या झालेल्या त्याच्या पत्नीचे नाव आहे. तहसीलच्या कोटगुल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत, मृत महिलेची आई चामरीबाई बोगा यांनी तिच्या मुलीचे लग्न सोनपूर येथील पुरुषोत्तम कचलम यांच्याशी समाजातील रीतिरिवाजांनुसार ठरवले होते. आणि या जोडप्याला दोन मुले देखील आहेत. दारूचे व्यसन असलेला पुरुषोत्तम हा तामिनाबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला.
यातच पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. या भांडणामुळेच सोमवारी (दि. १) तामिनाबाई पतीसोबत माहेरी निघाली होती. जंगल मार्गे येत असताना पुन्हा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. याच रागाच्या भरात पुरुषोत्तमने मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय मृत महिलेच्या आईने केला आहे.
Uttar Pradesh: ‘हात खाली कर’ असे ओरडत विद्यार्थ्याला मारहाण, कॉलेज कॅम्पसमधील व्हिडीओ वायरल