काय घडलं नेमकं?
कौस्तुभ सांगळे (वय २६) असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे, कोल्हापूरचा गट १६ मध्ये कार्यरत होता. कौस्तुभने कॉन्स्टेबलने सोमवारी संध्याकाळी आपल्या सर्व्हिस शस्त्राने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. गोळी झाडल्यानंतर मोठा आवाज ऐकायला आला. आवाज ऐकल्यानंतर परिसरातील इतर सुरक्षा कर्मचारी तात्काळ आवाज आल्याच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी तिथे कौस्तुभ खाली पडलेला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
पोलीस तपास सुरु
दरम्यान, घटनास्थळी कौस्तुभजवळ कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलीस त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास करत आहे.
मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले
मुंबईतील मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेला आहे. कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरात मोठे झाड दुकानावर कोसळल्याने 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दुकानावर पडलेले झाड कापून बाजूला केले. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. बेस्ट प्रशासनाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.






