Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

Murder Case : मध्य रात्री बापाची हैवानियत जागी झाली आणि त्याने झोपेतच पोटच्या तीन मुलींची गळा चिरुन हत्या केली. तो इथेच थांबला नाही तर धारदार शस्त्राने त्याने पत्नी आणि मुलावरही हल्ला केला. हत्येचे कारण आरोपीचे दुसऱ्या महिलेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 09:38 AM
प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

Follow Us
Follow Us:
  • एका कुटुंबात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
  • पहाटेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात कुटुंबातील काही सदस्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवल्याची माहिती समोर आली आहे.
  • प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद आणि वैयक्तिक संबंधांशी संबंधित कारणांचा तपास केला जात असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. इथे प्रेमात वेड्या झालेल्या बापाने स्वत:च्याच तीन मुलींची निर्दयीपणे हत्या केल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी मुली झोपत असताना धारदार शस्त्राने गळा चिरत त्यांचा खून करण्यात आला. मुख्य म्हणजे या हत्येदरम्यान व्यक्तीने आपल्या पत्नीला आणि लहान मुलालाही मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कसाबसा तिथून आपला पळ काढला. ही भीषण घटना मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनपूर पंचायतीच्या तुरुकडीहा गावात घडली. पोलिस घटनेचा तपास करत असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक ! नर्सिंगच्या फीसाठी पैसे नाहीत म्हणून विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मंगळवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंब शांत झोपलेलं होतं. यावेळीच आरोपी वडिल नंदू यादव उर्फ नंदकिशोर यादव (45 वर्ष) यांनी घरात ठेवलेले धारदार शस्त्र उचलले आणि झोपेत असलेल्या तीनही मुलींचा गळा चिरुन त्यांची हत्या केली. मृतकांमध्ये त्यांची मोठी मुलगी पल्लवी कुमारी (12 वर्ष) आणि दोन जुळ्या बहिणी रिद्धि कुमारी (6 वर्ष) आणि सिद्धि कुमारी (6 वर्ष) यांचा समावेश होता. तीनही मुली झोपेत असल्याने त्यांना बचावासाठी प्रयत्न करता आला नाही आणि झोपेतच बेडवर तडफडत त्यांचा मृत्यू झाला.

आईने मुलाला घेऊन पळण्यात यशस्वी

वडिल मुलींचा गळा चिरत असताना त्यांनी जोरात किंचाळायला सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून आरोपीची पत्नी राधा देवी या झोपेतून उठल्या आणि त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमिन हादरली. आपल्या तिन्ही मुलींना रक्ताच्या थारोळ्यात पडून आपल्या डोळ्यांदेखत मरताना पाहून ती घाबरली आणि तिच्या मनात मुलाचा विचार आला. खुनी पती नंदु यादव याने पत्नी आणि त्याच्या लहान मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण राधा देवी हिमतीने आपल्या मुलाला घेऊन तिथून पळून गेली. अंधाऱ्याचा फायदा घेत आई-लेक शेजाऱ्यांच्या घरी जाऊन लपले.

अनैतिक संबंध ठरले हत्येचे कारण

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आोरपी नंदकिशोर यादव एका फॅक्ट्रीत ड्रायव्हरचे काम करत होता. मागील काही काळापासून त्याचे दुसऱ्या गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. या अनैतिक संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद आणि भांडणे होत होती. सोमवारी देखील घरात यावरुन मोठा वाद झाला ज्याचा शेवट पतीने मुलांच्या हत्येने केला.

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

पोलिसांनी केली आरोपीला केली अटक

तिन्ही मुलींची हत्या केल्यानंतर गावात खळबळ उडाली आणि घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी माहिती मिळताच लगेच पोलिसांना बोलवले ज्यानंतर पोलिस तत्काळ घटनेस्थळी दाखल झाली. आरोपी वडिल घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच त्याला पकडलं आणि घेरून त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पोलिस सध्या आरोपीची चाैकशी करुन त्याच्या मानसिक स्थितीचा तपास घेत आहेत. पोलिसांनी तीन्ही मुलींच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवलं असून पोस्टमीर्टम रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Jharkhand father kills three daughters after alleged affair dispute crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crime news
  • Jharkhand Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल
1

जमीन हडपण्यासाठी बनावट दस्तऐवजांचे रॅकेट, तब्बल 50 लाखांची फसवणूक; 18 जणांवर गुन्हा दाखल

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना
2

Buldhana crime news: तलवारीने कापला केक; तिघांवर गुन्हा दाखल, वडगाव खंडोपत येथील घटना

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई
3

घरफोडी करणारी बिहारची टोळी गजाआड, तब्बल 14 तोळे सोन्याचे दागिने जप्त; गुन्हे शोध पथकाची कारवाई

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले
4

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.