(फोटो सौजन्य: Pinterest)
AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
झुडपांमध्ये मिळाला वडिलांचा मृतदेह
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सदर घटना २० जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास वाॅचमॅनने चिहाटीवरुन बरोराला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला एक मृतदेह पाहिला. त्याने लगेच पोलिसांना याची माहिती दिली, ज्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतलं आणि गुन्हा दाखल करुन घटनेचा तपास करायला सुरुवात केली. या घटनेचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम (SIT) स्थापन करण्यात आली.
१० लाखांची सुपारी
SIT ने आपला तपास सुरु केल्यानंतर फार कमी वेळेत आरोपींचा पर्दाफाश करण्यात आला. ग्रामीण एसपीने सांगितले की, मृत तुलेश्वर नोनिया यांचा मोठा मुलगा विजय नोनिया हा बऱ्याच काळापासून बेरोजगार होता. नोकरी न मिळत असल्याने तो तणावात गेला आणि त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचला. वडिलांच्या मृत्यूनंतर सहानभूतीच्या आधारावर त्याला बीसीसीएलमध्ये नोकरी मिळेल असा विचार आरोपीने केला. याच विचाराने मलगा विजय याने दोन आरोपींना आपल्या वडिलांची हत्या करण्यासाठी दहा लाखांची सुपारी दिली. आरोपींनी बुधवारी संधी साधत तुलेश्वर नोनिया यांना निर्जन जागी कोळशाच्या दगडाखाली चिरडून ठार मारले.
झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू
रक्ताने माखलेला दगड आणि बाईक ताब्यात
पोलिसांनी माहिती देत सांगितले की, हत्येचा मूळ सूत्रधार मुलगा विजय नोनिया, शूटर अखिलेश मल्लाह आणि अमित कुमार यांना अटक करण्यात आली आहे. चाैकशीदरम्यान तीघांनी आपला गन्हा कबूल केला असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड आणि एक मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. घटनेशी जोडलेले सर्व पुरावे ताब्यात घेण्यात आले असून फाॅरेंसिक रिपोर्टची प्रतीक्षा केली जात आहे. तपास अद्याप सुरु असून संबंधित आरोपींवर लवकरच कठोर आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.






