Photo Credit- Social Media तुरुंगात असलेल्या वाल्मिकबाबत जितेंद्र आव्हांडांचे गंभीर आरोप
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडयाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर बीड जिल्हा कारागृहात हलवण्यात आले. पण तुरूंगात असतानाही त्याच्याबाबत दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे समोर येऊ लागलेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई, यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत.
वाल्मिक कराड कारागृहात असला तरी त्याच्या सेवेसाठी पोलीस तैनात करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. “रात्री कारागृहात मैफिलींचा माहोल तयार होतो, ज्यामुळे तो तुरुंगात असल्याचा कोणताही आभास होत नाही,’ असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला असून त्यांनी या प्रकरणावरून महायुती सरकारवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
‘औरंगजेब’ च्या अवतारात दहशत निर्माण करणार बॉबी देओल; वाढदिवसानिमित्त ‘हरी हर वीरा
वाल्मिक कराडला प्रकृती खालावल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि पुन्हा बीड जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले. मात्र, त्याच्या सेवेसाठी सात पोलीस तैनात असल्याचा आरोप आव्हाड यांनी उचलून धरला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला आहे की, खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून, त्याच्या सेवेसाठी सात हवालदार तैनात करण्यात आले आहेत.
आव्हाड यांनी आरोप केला की, “वाल्मीक कराडच्या गँगमधील गुन्हेगार मुद्दामहून गुन्हे करून स्वतःला अटक करून घेतात, ज्यामुळे त्यांची रवानगी बीडच्या मध्यवर्ती कारागृहात होते. एकदा ते कारागृहात पोहोचले की, रात्री मैफिली रंगत असतात. शासनाने असा काहीतरी निर्णय घेतलेला दिसतो, ज्यामुळे वाल्मीक कराडला कारागृहात असल्याची जाणीवच होत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नव्हता. जामीन नाकारलेल्या व्यक्तीसाठी सात हवालदार तैनात करणे हे कायद्याला चेष्टाच ठरते,” असे आव्हाडांनी सांगितले आणि महायुती सरकारवर टीका केली.
“अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा”, असा टोला लगावत आव्हाडांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.
Phalodi Satta Bazar: कोण काबीज करणार दिल्लीची सत्ता? नव्या सर्व्हेने उडवली ‘या’ पक्षाची
दरम्यान, आज सकाळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईं यांनीदेखील बीडमधील पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले असल्याचा दावा करत त्या पोलीस अधिकाऱ्यांची थेट यादीच जाहीर केली आहे.वाल्मिक कराडचे जाळे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. तसेच, त्याचे निकटवर्तीय आणि मर्जीतील पोलिस अधिकारी मोठ्या प्रमाणावर असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्याचबरोबर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर तृप्ती देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी जाहीर केली असून, या पोलिसांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची मागणी देखील केली आहे.
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यात कॉन्स्टेबलपासून ते अधिकारी पर्यंतच्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी, गृहमंत्रालयाने या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.