कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ जवळील दामत गावात बकरी ईदचे दिवशी 500 गोवंश हत्या होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे गोरक्षकांनी पोलीसांच्या मदतीने अॅक्शनमोडवर शोधकार्य सुरु केलं. मात्र दामत गावातील प्रत्येक घरातील गोवंश यांची तपासणी केली असता केवळ 17 गोवंश यांना टॅगिंग नव्हते आणि त्यामुळे त्या सर्व 17 गोवंश यांची गोशाळेत रवानगी करण्यात आली.बकरी ईदच्या दिवशी दामत गावात कोणत्याही गोवंश ची हत्या होणार नाही म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता.दरम्यान, नेरळ पोलिस आणि अतिरिक्त कुमक यांचे रायगड चे पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी नेरळ येथे येऊन कौतुक केले.
कर्जत तालुक्यातील दामत या मुस्लिम बहुल गावात 500 गोवंश यांची कत्तल बकरी ईद चे दिवशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करीत रायगड जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडून अतिरिक्त पोलिस फाटा नेरळ येथे पाठवण्यात आला होता.त्यावेळी गोरक्षक प्रतीक ननावरे आणि अन्य 40/50 यांच्या मागणीनुसार 4 जून रोजी दामत गावात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने कुर्बानीकरीता 400/500 गोवंशीय जनावरे आहेत.
या आगोदर दामात येथील सर्व गोवंशीय जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ बागुल यांचे माध्यमातून आरोग्य तपासणी आणि टॅग करून घेण्यात आले.त्यांनंतर पोलीसांनी दोन दिवस दामत गावात सर्च ऑपरेशन राबविले असता त्यामध्ये 17गोवंशीय जनावरे बिना टॅगचे आढळून आल्याने संबंधीतावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला.परंतु तरी देखील गोरक्षक प्रतिक ननावरे याचे समाधान न झाल्याने तो त्याचे सहकारी यांचेसोबत नेरळ पोलीस ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यास बसले.सदरवेळी नेरळ येथील बजरंग दलाचे ॲड दिपक गायकवाड तसेच स्थानिक गोरक्षक प्रज्ञेश खेडेकर, अमोल सुर्यवंशी,ओमकार भडसावळे हे नेरळ पोलिस ठाणे येथे पोहचले.त्यावेळी स्थानिक गोरक्षक यांनी प्रतीक ननावरे आणि अन्य यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र स्थानिक गोरक्षक यांचे म्हणणे न ऐकता प्रतिक ननावरे आणि त्यांचे सहकारी यांनी टिवले हॉटेल समोर कर्जत बदलापूर कल्याण राज्यमार्ग अडवण्याचा प्रयत्न सुरू केला.तेथील नाका येथे वाहने अडविल्याने तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण होवून वाहतुकीच कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीसांनी सदर बेकायदेशीर जमावावर सौम्य लाठीचार्ज केला आणि संबंधित तिघांवर नेरळ पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल केले आणि रात्री सोडून दिले.त्यांनतर काल साजरी झालेली बकरी ईद चे दिवशी मुस्लिम बहुल गावामध्ये मोठ्या उत्सवात ईद साजरी झाली.
रायगड जिल्हा पोलिस अधिकारी आँचल दलाल यांच्याकडून पोलिसांना सर्वाधिकार दिल्याने आणि पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून नेरळ जवळील दामत तसेच कळंब आणि कळंब परिसरातील साळोख तसेच चिकनपाडा येथे गो हत्या होणार नाही याची काळजी घेतली.संपूर्ण दिवसभर गोवंश हत्या झाली नसल्याचा दावा पोलिसांनी केला असून पोलिसांच्या सतर्क भूमिकेमुळे नेरळ परिसरात होणारा दंगलीचा प्रकार रोखला गेला आहे.
दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी रात्री साडेनऊ वाजता नेरळ पोलिस ठाणे येथे येऊन नेरळ पोलिसांशी चर्चा केली आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन यांचे कौतुक केले.सद्यस्थिती नेरळ परिसरात शांतता असून रायगड जिल्हयाचा नव्याने पदभार स्विकारलेल्या, पोलीस अधीक्षक दलाल यांनी दामत तसेच इतर गावात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करणा-या इसमांविरूध्द कडक स्वरूपाची कारवाई करण्याच्या सुचना प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना दिलेल्या आहेत.