कलीम कुरेशी टोळीला पोलिसांचा मोठा दणका, थेट मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार अद्यापही फरार
पर्यटकांसाठी किल्ला बंद
रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पोलिसांचे पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सुमारे अडीच तास म्हणजेच सकाळी १०:३० वाजेपर्यंत घटनास्थळावर ही तपास प्रक्रिया आणि पाहणी सुरू होती. या क्राईम सीन रिक्रिएशनदरम्यान कमालीची गुप्तता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली होती. तपास सुरू असेपर्यंत लोहगड किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणत्याही पर्यटकाला किंवा सर्वसामान्य नागरिकाला किल्ल्यावर प्रवेश दिला गेला नाही.
डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनाक्रम
केतन अग्रवाल हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस आपल्यासोबत एक ‘डमी पुतळा’ घेऊन लोहगडावर पोहोचले होते. केतनला कसे लोहगडावरून ढकलण्यात आले याचा सिलसिलेवार तपास करण्यासाठी या डमी पुतळ्याची मदत घेण्यात आली. आरोपी सिया गोयल हिच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून हा डमी पुतळा खाली ढकलून संपूर्ण घटनाक्रमाचे अत्यंत बारीकीने पुनरावलोकन केले. या तपासाच्या वेळी पोलिसांचे अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी स्वतः हजर होते. या क्राईम सीन रिक्रिएशनमधून मिळालेले पुरावे न्यायालयात आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
सियाला श्वास घेण्यास त्रास
दरम्यान, लोहगडावरील सियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिया मास्क घालून आल्याचं दिसून येत आहे. सीन रिक्रिएट करुन झाल्यानंतर लोहगडावरुन खाली उतरताना सियाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे सियाने तोंडावरील मास्क काढले आणि थोडावेळ एकाच जागी थांबून मोठ्याने श्वास घेऊ लागली. यानंतर पुन्हा चेहऱ्यावर मास्क घालून सिया गोयल लोहगडावरुन खाली उतरली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही उपस्थित होता.
Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले.
Ans: घटनाक्रम समजून घेण्यासाठी डमी पुतळ्याचा वापर करण्यात आला.
Ans: हत्येचा घटनाक्रम आणि तिची भूमिका समजून घेण्यासाठी तिला घटनास्थळी नेण्यात आले.






