काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आयुष (वय 10) असे आहे. लेखन दादू सकट यांच्या घरासमोर एक नारळाचं झाड सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घरावर कोसळलं. यावेळी घरात आयुष, आई काजल आणि वडील अक्षय चौगुले हे झोपले होते. त्याचदरम्यान नारळाचं खोड थेट घरावर कोसळलं. घराचा पत्रा फुटून झाड झोपलेल्या आयुषच्या अंगावर कोसळलं.
दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
या आयुष गंभीर जखमी झाला. त्याच्या नाका- तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. ग्रामस्थांनी त्याला तातडीने कागल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरु करण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष हा त्याचा एकुलता एक मुलगा होता. आयुष्य हा इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून कागल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद नोंदवण्यात आली.
सोशल मीडियावरून ओळख, लॉजवर नेऊन अत्याचार; व्हिडिओ व्हायरलची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीला सोशल मीडियावर मैत्री करणं महागात पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीची सोशल मीडियावर एका तरुणासोबत मैत्री झाली. त्यांनतर त्याने या मुलीला भेटायला बोलावले. त्याने तिला लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित तरुणी ही 21 वर्षांची असून गडहिंग्लजची आहे. ती खासगी नौकरी करते. तर या प्रकरणातील आरोपीचे नाव गणेश खोत असे आहे. तो पन्हाळा तालुक्यातील अभियांत्रिकी पदवीचं शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाली आणि गणेश याने तरुणीला कोल्हापुरात भेटायला बोलावले. त्यांनतर पन्हाळा येथील लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला.
Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथे घडली.
Ans: मृत मुलाचे नाव आयुष असून तो 10 वर्षांचा होता.
Ans: घरावर नारळाचे झाड कोसळून झाडाचा बुंधा अंगावर पडल्याने आयुषचा मृत्यू झाला.






