कोलकाता रुग्णालयातील ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करणार होती पीडिता? सहकाऱ्यांनी केला मोठा खुलासा
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवं नवीन खुलासे होत आहे. या घटनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. न्यायाच्या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील सरकारी रुग्णालयांतील ज्युनियर डॉक्टरांचा संप रविवारीही सुरूच राहिल्याने राज्यातील आरोग्य सेवांवर सलग 10व्या दिवशीही परिणाम झाला. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी दुसऱ्याच दिवशी एका आरोपीला अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
हे सुद्धा वाचा: भारतीय राज्यघटनेतील कलम १६३ आहे तरी काय? कोलकाता आरजी कर रुग्णालयात लागू, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
दरम्यान, पीडितेच्या सहकाऱ्यांनी या घटनेबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत. एका वृत्तानुसार, एका सहकाऱ्याने सांगितले की, या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोस्टिंगची शिक्षा आणि लांब शिफ्ट ही सामान्य गोष्ट झाली आहे. तसेच पीडितेला ‘औषध रॅकेट’ची माहिती मिळाली असावी, ज्याचा तिला पर्दाफाश करायचा होता. म्हणूनच तिचा आवाज दाबण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी. ‘आम्हाला संशय आहे की हा अत्याचार आणि खुनाची साधी गोष्ट नाही. तिला टार्गेट करुनच तिची हत्या करण्यात आली असावी. त्या शिफ्टमध्ये सेमिनार हॉलमध्ये ती एकटी होती हे सिव्हिक व्हॉलंटियरला कसे कळले? असा सवाल पीडितेच्या सहकऱ्यांनी उपस्थित केला.
हे सुद्धा वाचा: धक्कादायक! एकाच शाळेतील 4 वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, आणखी एका सहकाऱ्याचा दावा आहे की पीडितेला अशा गोष्टींबद्दल बरेच काही माहित असावे जे की तिला माहिती नसायला पाहिजे होती. तिच्या विभागात ड्रग्ज सिफनिंग रॅकेट सुरू असल्याचा संशय आहे, ज्याचा तिला पर्दाफाश करायचा होता. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनीही अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, पीडितीने कामाच्या प्रचंड दबावाची तक्रार केली होती. अनेक सहकाऱ्यांनी सांगितले की त्यांना जास्त तास काम करायला लावणे ही या संस्थेची एसओपी बनली आहे. खुद्द माजी प्राचार्य संदीप घोष यांनी त्याचे काटेकोरपणे निरीक्षण केले. सीबीआय अधिकारी संदीप घोष यांचे कॉल डिटेल्स आणि चॅटची माहिती गोळा करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, घोष रविवारी सलग तिसऱ्या दिवशी सीबीआय अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये घटनेपूर्वी आणि नंतर केलेल्या फोन कॉल्सचा तपशील देण्यास सांगितले आहे.