एकाच शाळेतील 4 वर्षांच्या दोन चिमुकल्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार (फोटो सौजन्य-ट्विटर)
कोलकात्यात ट्रेनी डॉक्टरच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. एका नराधमानं ट्रेनी डॉक्टरवर अत्याचार करुन तिला जीवे मारलं. या घटनेनं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना बदलापूर मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बदलापूरमध्ये एकाच शाळेतील दोन चार वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. या घटनेबाबत बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
बदलापुरातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर मधील एका नामांकित शाळेत ही घटना घडली असून संपूर्ण बदलापूर शहर हादरलय. मात्र बदलापूर पूर्व पोलिसांनी हा गुन्हा दाखल करण्यास तब्बल १२ तास पीडित कुटुंबाला तातकळत ठेवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. त्यामुळे बदलापूर पूर्व पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात गुन्ह्याची नोंद करून घेण्यासाठी पीडित कुटुंबाला तब्बल बारा तास ताटकळत ठेवल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अखेर राजकीय पक्ष्यांच्या महिला पदाधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांनी पीडित कुटुंबासोबत पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत थांबुन गुन्हा दाखल करून घेतला.
हे सुद्धा वाचा: दुचाकीवरून सातजण आले, भरचौकात कारमध्ये घुसले अन्…
एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर नराधमाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणात एका मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुली प्रसाधनगृहात जात असताना शाळेतील एका कर्मचाऱ्याने संतापजनक प्रकार मुलींसोबत केला आहे. या घटनेबाबत पीडित चिमुकलीने शाळेत घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पालकांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाले. तर पीडित मुलीच्या पालकांनी इतर पालकांना देखील याबाबत सांगितल्या नंतर आणखी एका चिमुकलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं.
हे सुद्धा वाचा: कोलकातामध्ये आणखी एका मुलीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न! तीन भामट्याना नागरिकांनी घेतलं ताब्यात
या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात शाळेत साफसफाई करणाऱ्या तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बदलापूर शहरातील नामांकित शाळा समजल्या जाणाऱ्या शाळेत हा प्रकार घडल्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. मात्र इतक्या संवेदनशील घटनेबाबत पोलिसांनी दाखवलेल्या या बेजबाबदार आणि हलगर्जीपणामुळ पोलिसांवर टीका होत आहे .