पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या, घरी परतत असताना हल्ला (फोटो सौजन्य-X)
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याला बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. बोलपूर उत्तरनारायणपूर गावात तृणमूल काँग्रेसचे नेते रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आले. बीरभूम जिल्ह्यातील शांतीनिकेतन पोलीस स्टेशन हद्दीतील कंकालितला ग्रामपंचायतीच्या उत्तरनारायणपूर गावात शनिवारी (2 नोव्हेंबर) रात्री उशिरा तृणमूल काँग्रेसच्या पंचायत सदस्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी त्यांना रक्तस्त्राव अवस्थेत बर्दवान मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपाचारादरम्यान त्यांना मृत्यू घोषित करण्यात आले.
समीर थंडर (४५) असे मृत तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक सदस्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी पाच आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, समीर थंडर हे शनिवारी रात्री उशिरा उत्तरनारायणपूर गावात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.त्यांना प्रथम बोलपूर विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला बर्दवान मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.
हे सुद्धा वाचा: दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा प्रवाशांना मनस्ताप; एसटी स्थानकांमध्ये तब्बल लाखोंचा माल गेला चोरीला
समीर थंडर हे पारुलडांगा पंचायतीचे सदस्य होते. समीर यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत समीर थंडर यांच्या दोन्ही पत्नी रीटा थंडर आणि मामनी थंडर म्हणाल्या, रात्री आम्हाला फोनवर बातमी मिळाली की काहीतरी गडबड आहे. त्यानंतर समीर यांना बेदम मारहाण केल्याचे ऐकले. याआधीही हाणामारी झाली होती. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. उत्तरनारायणपूरच्या लोकांनीच त्यांची हत्या केली. दोषींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दरम्यान, तृणमूलचे बोलपूर ब्लॉक अध्यक्ष मिहिर राय म्हणाले: हत्येचे कारण समजू शकलेले नाही. पण हा पक्षाचा मुद्दा नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कंकलीतला ग्रामपंचायतीचे उपप्रमुख मोहम्मद ओहिउद्दीन उर्फ ममन म्हणाले: याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही.
समीर थंडर यांचा मुलगा प्रतीक थंडर म्हणाला, ‘गावातील काही लोकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला. तर सुरी विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे आमदार विकास रॉय चौधरी यांनी सांगितले की, गावातील काही वादातून थंडर यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
या घटनेप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी उत्तर २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांवर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मिंखा येथील तुनमुलच्या आमदार उषा राणी मंडल यांना गुरुवारी रात्री कालीपूजा मंडपातून परतत असताना हरोआ परिसरात 100 ते 150 लोकांनी घेराव घातला. आपल्याला वाहनातून फेकून मारण्यात आल्याचे मंडल यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेदरम्यान अनेक गोळ्याही झाडण्यात आल्या.
हे सुद्धा वाचा: पुण्यात निवृत्त लष्करी जवानाकडून गोळीबार; कारण जाणून व्हाल थक्क