Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: नववीत शिकणाऱ्या स्वराची ३७ वर्षीय संशयिताकडून धारदार शस्त्राने हत्या; माणगाव हादरलं!

माणगावमध्ये नववीत शिकणाऱ्या स्वरा उपाध्येची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. नवरात्रोत्सवात आरती करून परतताना तिच्यावर हल्ला झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. संशयिताचा शोध सुरू असून, स्वराला न्याय मिळावा यासाठी आज माणगाव बंद आणि कँडल मार्चचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 19, 2026 | 04:23 PM
image

image

Follow Us
Follow Us:
  • स्वराची हत्या: आरतीवरून परतताना हल्ला.
  • संशयिताचा शोध: पोलिसांकडून तपास सुरू.
  • माणगाव बंद: कँडल मार्चचे आवाहन.
 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. माणगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. स्वरा नितीन उपाध्ये असे मृत मुलीचे नाव असून, ती इयत्ता नववीत शिकत होती. शनिवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या आवारात ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे माणगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

आरती करून परतताना स्वरावर प्राणघातक हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा ही चंद्रप्रभू मंदिराच्या आवारात राहत होती. धार्मिक वृत्तीच्या स्वराची नवरात्रोत्सवादरम्यान मंदिरातील आरतीला दररोज उपस्थिती असायची. शनिवारीही ती वैष्णवी देवीच्या मंदिरात आरतीसाठी गेली होती. आरती आटोपून घरी परतत असताना मंदिराच्या आवारातच तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात स्वरा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी हातकणंगले पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी स्वराला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

हेही वाचा: Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

संशयित आरोपीचा शोध सुरू; हत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट

या प्रकरणात अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) हा संशयित असल्याची माहिती आहे. घटनेनंतर हातकणंगले पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. स्वरावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, हल्ल्यामागील कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबी तपासातून स्पष्ट होणार आहेत.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथक; पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांकडूनही घटनेशी संबंधित माहिती आणि परिस्थितीचा तपास केला जात आहे.  अल्पवयीन मुलीची मंदिराच्या आवारात हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील संशयिताला शोधून घटनेचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

स्वराच्या मृत्यूनंतर माणगाव बंद आणि कँडल मार्चचे आवाहन

स्वरा उपाध्ये हिच्या मृत्यूमुळे माणगावमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि स्वराला न्याय मिळावा, या मागणीसाठी आज माणगाव बंद आणि कँडल मार्चचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून, प्रकरणातील संशयितावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वरा उपाध्ये हिच्यासोबत काय घडले?

    Ans: माणगाव येथे नवरात्रोत्सवातील आरती करून परतत असताना स्वरा उपाध्ये हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला.

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे शनिवारी रात्री सुमारे दहा वाजता घडल्याची माहिती आहे.

  • Que: हत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे का?

    Ans: नाही. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Managaon sw ara upadhye murder case village band candle march sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Hatkanangale
  • Kolhapur Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ
1

Kolhapur Crime: जयसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार! सराईत गुन्हेगार महेश दळवी यांचा मृत्यू, परिसरात खळबळ

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून
2

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
3

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!
4

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.