ठाणे: डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. यूसूफ शेख आणि नौशाद आलम अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका डान्स बारमध्ये एका बारबालेवर यूसूफ या चोरट्याचा जीव जडला. आत्तापर्यंत त्याने तिच्यावर ५० लाख रुपयांची उधळण केली. केवळ तिच्यावर पैसे उधळण्यासाठी यूसूफ त्याचा मित्र नौशाद सोबत चोऱ्या करीत होता.
काही दिवसांपासून डोंबिवलीत घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कल्याणचे डीपीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चौरी, लूट सारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली .डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने, पोलिस अधिकारी सनिल तारमळे, अविनाश वनवे आणि प्रशांत आंधळे या तीन पोलिस अधिकाऱ्यांचे पथकाने सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास सुरु केला. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांनी नवी मुंबईतील येथील घणसाेली परिसरात राहणारा यूसूफ शेख आणि त्याचा मिक्ष नौशादला अटक केली. या दोघांकडून १८ गुन्ह्याची उकल झाली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणेत दागिने, पैसे, लॅपटॉप, मोबाईल इतर साहित्य जप्त केले आहे.
यूसूफ याला २३ चोरी प्रकरणात या आधी अटक करण्यात आली होती. नौशादलाही ११ चोरीच्या गुन्हयात अटक करण्यात आली होती. हे दोघे चोरी कशासाठी करायचे हे ऐकून पोलिसही हैराण झाले. मुंबईतील एका डान्सबारमध्ये काम करणाऱ्या बारबालेवर यूसूफचा जीव जडला. तिच्यावर आपला प्रभाव पाडण्यासाठी यूसूफने आत्तापर्यंत ५० लाख रुपये उधळले आहे. नौशाद त्याच्यासोबत डान्सबारमध्ये जात होता. हे दोघेही चेारी केलेले पैसे तिच्यावर उधळायचे . लोक जे कष्टाची कमाईवर हे दोघे डल्ला मारुन त्याची उधळण चक्क एका बारबालेवर करीत होते.