काय घडलं नेमकं?
हा अपघात नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन तरुण आपल्या दुचाकीवरून जात असतांना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारत धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघेही खाली पडले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ चा थरार; घटना CCTV त कैद झाली आहे, भरधाव चारचाकीची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे.#Nashiknews #nashikaccidentnews #Accidentnews #hitandrun pic.twitter.com/BGO8d6BpwS — Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) January 27, 2026
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संबंधित चारचाकी गाडीचा शोध घेतला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. हा अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.
नागरिकांचा संताप
या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊन नागरिकांच्या जोवाशी खेळ करू नये असं म्हणत संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे.
प्रजासत्ताक दिनी मालेगावमध्ये दुर्घटना! तिरंगी फुगे घेताना नायट्रोजन सिलेंडरचा स्फोट; 5 जण गंभीर जखमी
देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत, मोठ्या पासून ते छोट्या पर्यंत सगळी कडे आपल्याला तिरंगा रंग पाहायला मिळतो. मुलांच्या खिशावर, हातात आपल्याला तिरंगा दिसतो. एकीकडे नाशिकच्या मालेगावात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत होता. तर दुसरीकडे मालेगावात दुर्घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फुगे घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांजवळ अचानक नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये ४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना मालेगावातील कॉलेज बस स्टॉप येथे घडली.
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन बेतले जीवावर; आर्थिक अडचण आल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Ans: नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात.
Ans: अपघातात किती जण जखमी झाले?
Ans: कारचालक अल्पवयीन असून तो एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.






