काय घडलं नेमकं?
शनिवारी सकाळी शाळेकडे जात असताना शिरसाड नाका येथे बसस्टॉपकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि, या धडकेत ट्रकचा टायर अंगावरून गेल्याने स्वीडल गोम्स यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरु
अपघातानंतर संबंधित हायवा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून ट्रक चालकाचा शोध घेत आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात आणि शाळेत हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.
Rohit Shetty गोळीबार प्रकरणात ‘हवाला’ कनेक्शन उघड! बिश्नोई गँगने शूटर्सना पुरवली मोठी रसद; मुंबई क्राईम ब्रांचचा खुलासा
गेल्या फेब्रुवारीमध्ये जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत आता महत्त्वपूर्ण खुलासे समोर येत आहेत. गोळीबार करणाऱ्यांना (शूटर्सना) भरती करण्याची जबाबदारी असलेल्या ‘गोलू पंडित’ या व्यक्तीला ‘हवाला’ व्यवस्थेमार्फत निधी पुरवण्यात आला होता, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने आता उघड केली आहे. बिश्नोई टोळीने नेपाळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागांत पसरलेल्या हवाला जाळ्यांच्या माध्यमातून हा निधी गोलू पंडितपर्यंत पोहोचवला होता.
Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या
Ans: विरारमधील शिरसाड नाका, मुंबई–अहमदाबाद महामार्गावर.
Ans: स्वीडल गोम्स, 40 वर्षीय शिक्षिका.
Ans: ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला; पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






