Mumbai Crime News: लोकलमध्ये घुसून महिलांसोबत लज्जास्पद कृत्य करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक
Mumbai Crime News: मीरा-भाईंदरमधून एक संताप आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका गणवेशधारी पोलिस कॉन्स्टेबलने गणवेशावरच महिलांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेला हा कॉन्स्टेबल शनिवारी दुपारी बोरिवलीहून वसईला जाणाऱ्या स्लो लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढला आणि तिथे उपस्थित असलेल्या महिलांचा विनयभंग करू लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडली. बोरिवलीहून निघालेली लोकल ट्रेन मीरा रोड स्टेशनवर येताच, अमोल किशोर सपकाळे नावाचा एक कॉन्स्टेबलचे नाव असून तो वर्दीमध्ये असतानाच खाकी गणवेशात महिलांच्या डब्यात चढला.
प्रत्यक्षदर्शी महिलांच्या म्हणण्यानुसार, किशोर सपकाळे याने दारू प्यायली होती. दारूच्या नशेतच तो महिलांच्या डब्यात शिरला. पण तिथेच न थांबता त्याने महिलांसोबत अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली. काही महिलांनी सांगितले की तो जाणूनबुजून त्यांच्या पाठीला कोपराने स्पर्श करत होता. तसेच, तो सीटवर बसून काहीं महिलांकडे जाणीवपूर्वक तिकिटे मागण्याचे नाटक करत होता.
लोकल ट्रेनमध्ये ड्युटीवरील एका कॉन्स्टेबलने केलेल्या गैरवर्तनामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नायगाव स्थानकाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे महिलांनी संतापून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला गाडीतून उतरवून तक्रार दाखल केली.
BSNL’s Freedom Offer: BSNL ने उडवली Airtel ची झोप! अनलिमिटेड कॉलिंग आणि 2GB डेटा मिळणार केवळ
अमोल सपकाळे नावाचा पोलिस कॉन्स्टेबल लोकल ट्रेनमध्ये महिलांशी असभ्य वर्तन करत होता. त्याच्या वागणुकीमुळे महिला प्रवासी अस्वस्थ झाल्या. त्याने एक-दोन महिलांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे महिलांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
शेवटी त्रास सहन न करता महिलांनी मिळून नायगाव स्थानकात त्याला उतरवले आणि स्टेशन मास्तराकडे तक्रार केली. स्थानक मास्तरांनी तात्काळ वसई रोड रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोल सपकाळे याला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीत तो मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी वसई येथील रहिवासी अभया अक्षय वर्णेकर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वसई रोड रेल्वे पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलम ७४ (महिलांच्या मर्यादेचे उल्लंघन) आणि कलम ३५१ (२) (धमकी व जबरदस्ती) अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
या घटनेनंतर महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “जर गणवेशातील पोलिसच असुरक्षितता निर्माण करत असतील, तर सामान्य प्रवासी कुणावर विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महिलांच्या डब्यांमध्ये सुरक्षेचे अधिक उपाय योजावेत, अशी मागणी प्रवाशांकडून रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडे होत आहे.