काय घडलं नेमक?
मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ अन्सारी हे मालवणी बॅक रोडवरून गोरेगावकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची ओला कॅबला किरकोळ धडक लागली. या छोट्याशा अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरात अन्सारी यांनी हेल्मेटने कॅबवर मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर हा वाद चिघळत गेला आणि हाणामारीत झाला. या भांडणादरम्यान ओला कॅब चालक सत्येंद्र गुप्ता (28) आणि त्याच्या गाडीत असलेला प्रवासी सुनील पाल (27) यांनी अन्सारी यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
Gadchiroli Crime: डोळ्यात मिरची, छातीत ‘वाकसा’ने सपासपवार करून हत्या; 5 वर्षांचा वाद जीवावर बेतला!
या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन विशेष पथके तयार करून काही तासांतच दोन्ही आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे.
एक आरोपी माणसेशी संबंधीत
अटक करण्यात आलेल्या एक आरोपी मनसेशी संबंधित आहे. आरोपी सत्येंद्र गुप्ता हा मनसेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुसरा आरोपी सुनील पाल हा वॉटर पंप मेकॅनिक म्हणून काम करतो. या प्रकरणात वापरण्यात आलेले धारधार शस्त्र आरोपींकडे कसे आले, तसेच या घटनेचं आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहे.
वादातून संताप अन् टोकाचं पाऊल… पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपी सुरत मधून अटकेत
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलल्याचे समोर आले आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सुरत येथून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने मृत्यूपूर्वी तक्रार दाखल केली होती. महिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Pune crime: जामखेड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
Ans: मुंबईतील बांगूर नगर परिसरात ही घटना घडली.
Ans: शरीफ अन्सारी (वय 27) असे मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: दुचाकी आणि ओला कॅबच्या किरकोळ अपघातानंतर वाद सुरू झाला.






