प्रयागराज : माफिया (Mafia) अतिक अहमदसोबतचा (Atique Ahmed News Update) फास अधिकाधिक आवळला जात आहे. पुन्हा एकदा यूपी पोलीस (UP Police) त्याच्यावर खटला (Law Suit) चालवण्यासाठी गुजरातच्या साबरमती कारागृहात (Gujarat Sabarmati Jail) पोहोचले आहेत. अलीकडेच, २००६ मध्ये उमेश पाल अपहरण प्रकरणात (Umesh Pal Kidnapping Case) अतिकला दोषी ठरवण्यात आले आहे. आता अतिकला उमेश पाल खून प्रकरणात हजर व्हावे लागणार आहे. पोलिस व्हॅनसह साबरमती कारागृहात पोहोचले आहेत.
यूपी पोलीस अतिक अहमदसह रवाना झाले आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर व्हॅनमध्ये बसत असताना अतिकने आपल्या जीवाला असलेल्या धोक्याची माहिती दिली. तो म्हणाला की सर्व काही ठीक नाही. या लोकांचा हेतू योग्य नाही. या लोकांना माझा गेम करायचा आहे.
[read_also content=”११ एप्रिल २०२३ : मीन राशीच्या बाजूने आज निकाल येईल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सर्व काही ठीक होईल https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-rashibhavishya-11-april-2023-the-result-will-be-in-favor-of-pisces-everything-will-be-fine-in-your-personal-life-read-horoscope-in-marathi-nrvb/”]
प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयाने अतिकचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहण्याचा अर्ज फेटाळला. यानंतर पोलीस वॉरंट-बी घेऊन साबरमती कारागृहात पोहोचले आहेत. आतिकचे सध्या मेडिकल केले जात असून, त्यानंतर सायंकाळपर्यंत अतिकसोबत पोलिस निघू शकतात. पोलीस बॉडी ऑन कॅमेरे सज्ज आहेत. यासोबतच व्हॅनच्या गेटला बायोमेट्रिक लॉक लावण्यात आले आहे.