crime (फोटो सौजन्य: social media)
केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित नवरी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा तिने आपल्या खोलीतील कपाटाचा दरवाजा उघडला. तेव्हा सर्वांना धक्काच बसला. २२ लाख रुपयांचे दागिने गायब झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसानंतर ते दागिने त्या घराजवळच सापडले.
जयंतीच्या वादातून एका शिक्षकाचा खून; फरार दोघांना हैदरबादातुन अटक
नेमकं काय प्रकार?
ही घटना केरळच्या कन्नूर मध्ये घडली आहे. नवरी लग्नाच्या दुसऱ्या रात्री नावणीवहीत नवरी आपल्या खोलीत जाते. खोलीत गेल्यावर जेव्हा तिने कपाट उघडले, तेव्हा ती एवढ्या जोरात ओरडली की आजूबाजूंच्या घरांच्या लायटी लागल्या. लग्नाच्या धावपळीमध्ये नवरीने लाखो रुपयांचे दागिने कपाटात काळजीपूर्वक ठेवले होते. विवाहित महिला आर्चा, एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. जिचे १ मे रोजी ए. के. अर्जुन यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर, आर्चाने आपले दागिने काढून एका शोल्डर बॅगेत ठेवले आणि ती बॅग पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटात ठेवली.
नंतर रात्री ९ च्या सुमारास, जेव्हा आर्चाने कपाट उघडले, तेव्हा तिला दागिने गायब झाल्याचे दिसले. दागिन्यांची किंमत सुमारे २२ लाख रुपये होती. आर्चाच्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि सर्व पाहुण्यांची यादी बनवून तपासणी सुरु केली. पण काहीच पुरावा सापडला नाही. परंतु दोन दिवसानंतर असे काही घडले की सर्वांच्या भुवया उंचावल्या
७ मेच्या सकाळी, जेव्हा पोलीस पुन्हा एकदा घराच्या आजूबाजूला तपास करत होते, तेव्हा घरापासून फक्त दोन मीटर अंतरावर झुडपांमध्ये एक पांढऱ्या कापडाची पिशवी सापडली. खरे तर, लग्नाच्या दिवशी चोरीला गेलेले सर्व दागिने चोराने दोन दिवसानंतर घराजवळ पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले होते. त्यात बांगड्या, हार, कमरबंद, अंगठ्या, झुमके, सर्व काही जसेच्या तसे आणि सुरक्षित होते.
पोलीस सब-इन्स्पेक्टर सनीथ सी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एकही दागिना गायब नव्हता. असे वाटते की चोराने पश्चाताप किंवा भीतीमुळे दागिने परत केले असावेत. फिंगरप्रिंट टीमने बॅग आणि दागिन्यांवरून नमुने गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचेही नमुने घेतले जात आहेत आणि अधिकचा तपास करत आहेत.
साताऱ्यातील मसूरमध्ये अपघात; दुचाकी खांबाला धडकल्याने दोघांचा मृत्यू