crime (फोटो सौजन्य: pinterest)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वादातून शिक्षकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपी फरार होते. फरार आरोपींना हैद्राबादमधून येथून पोलीस पथकांनी अटक केली आहे. आता पर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लातूर जिल्ह्यातील कासार शिरसी ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील, औंढा (ता. निलंगा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वादातून शिक्षकाचा खून करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरून वाद झाला होता. दरम्यान, २६ एप्रिलरोजी मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीमध्ये बडूर गावाचे शिक्षक गुरुलिंग हासुरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कासार शिरसी पोलीस ठाण्यात दत्तू मारुती गायकवाड (रा. औंढा), अजय चौंडा, अझर मोहम्मद, आदित्य मोरे, गजेंद्र सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार शिरसी), संजय गायकवाड राजेंद्र गायकवाड, शहाजी गायकवाड (रा. औंढा) अश्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील काही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने करत सात आरोपींना अटक केली आहे. मात्र, यातील अझर मोहम्मद आणि गजेंद्र सरवदे हे पोलिसांना गुंगारा देत फरार होते. दरम्यान, ते हैदराबाद येथे दडून बसल्याची माहिती कासार शिरसी पोलिसांना खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिस पथक हैदराबाद येथे धडकत दोघा फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक व्हावी आणि गुरुलिंग हासुरे यांना न्याय मिळावा म्हणून बडूर येथे गेल्या आठवडाभरापासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिली आहे. गुरुवारी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही बडूर येथे भेट देत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. फरार आरोपींना तातडीने अटक करावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, अवघ्या २४ तासात सहायक पोलिस निरीक्षक प्रविण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, बाळू गायकवाड, श्रीहरी डावरगावे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोघा आरोपींच्या हैदराबाद येथून फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर लैगिंक अत्याचार; तब्बल ५ वर्ष …..