Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime : गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

फुलेनगर भागातील किरण निकम खून प्रकरणाच्या वादातून सुरू झालेल्या टोळीयुद्धातून (गँगवार) पेठरोड आणि शेषराव महाराज चौकात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमधील दोन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2026 | 01:42 PM
गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

गोळीबार प्रकरणातील दोन सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

नाशिक : फुलेनगर भागातील किरण निकम खून प्रकरणाच्या वादातून सुरू झालेल्या टोळीयुद्धातून (गँगवार) पेठरोड आणि शेषराव महाराज चौकात झालेल्या गोळीबाराच्या घटनांमधील दोन मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे. गेल्या १० महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार विकी विनोद वाघ आणि दुसरा संशयित किरण मोरे या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

 

अंत्यविधी प्रसंगी झाला होता गोळीबार

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर येथील किरण निकम याच्या हत्येनंतर परिसरातील वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती. या गँगवारमधूनच गेल्या वर्षी पेठरोड परिसरातील राहुलवाडी येथे एका ओळखीच्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या सागर जाधव या युवकावर दोघांनी भरदिवसा गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यात विकी वाघ मुख्य सूत्रधार होता.

या खळबळजनक गोळीबारानंतर नाशिक शहर पोलिसांनी तातडीने पावले उचलत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यासह तब्बल १२ ते १५ जणांवर मोक्का अंतर्गत व इतर गंभीर कलमांन्वये कारवाई करून त्यांना अटक केली होती. मात्र, घटनेनंतर मुख्य संशयित विकी वाघ आणि त्याचा साथीदार किरण मोरे हे दोघेही पोलिसांना चकवा देऊन फरार झाले होते.

शेषराव महाराज चौकातील गोळीबारातही सहभाग

अटक करण्यात आलेला दुसरा संशयित किरण मोरे हा देखील गंभीर गुन्ह्यात फरार होता. त्याने शहरातील शेषराव महाराज चौक परिसरात महाले नामक एका युवकावर भररस्त्यात गोळीबार केला होता. या घटनेनंतर शहरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तेव्हापासून पोलीस मोरेच्या शोधात होते.

हे सुद्धा वाचा : महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

पोलिसांची वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी

गेल्या १० महिन्यांपासून पोलीस या दोन्ही सराईत गुन्हेगारांचा माग काढत होते. दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला हे दोन्ही संशयित वेगवेगळ्या ठिकाणी लपले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुख्य संशयित विकी वाघ हा चांदवड तालुक्यातील एका दुर्गम गावात नाव बदलून राहत होता, तर किरण मोरे हा नाशिकरोड परिसरात दबा धरून बसला होता. पोलिसांनी तत्काळ दोन स्वतंत्र पथके तयार करून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि अत्यंत शिताफीने या दोन्ही सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या दोन्ही संशयितांच्या अटकेमुळे पंचवटी आणि पेठरोड परिसरातील गैंगवारला मोठा चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी गेल्या १० महिन्यांत कोठे आश्रय घेतला होता आणि त्यांना कोणी आर्थिक रसद पुरवली, याचा सखोल तपास आता पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.

Web Title: Panchavati police have arrested two criminals in the firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार
1

पहाटे महिलेच्या घरात गेला, पलंगावर पाडून तोंड दाबले अन्…; सिल्लोडमधील संतापजनक प्रकार

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…
2

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…
3

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई
4

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.