File Photo : Crime
गुवाहाटी : गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात आसाममधील चिरांग जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीवर सहा तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाहीतर या आरोपींनी याप्रकाराचा व्हिडिओही बनवला आणि पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअरही केला. या प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ ‘खल्लास’; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती
अत्याचाराची ही घटना आसाम राज्यात घडल्याची माहिती दिली जात आहे. भारत-भूतान सीमेजवळील चिरांगच्या बेंगटोल भागात ही घटना घडली असून, मुलीच्या कुटुंबीयांनी आम्हाला आरोपींकडून धमकावले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडितेने सुरुवातीला याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र, पीडित तरुणीला धमक्यांमुळे मानसिक धक्का बसला आहे. तिने घटनाक्रम सांगितल्यावर मुलांनी तिच्यावर अधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या अत्याचाराची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर सहापैकी पाच आरोपींना अटक केली. यातील सहा आरोपींपैकी दोन अल्पवयीन आहेत. तर उर्वरितांचे वय 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना ऑगस्टमध्ये भारत-भूतान सीमेजवळ चिरांगच्या बेंगटोल भागात घडली होती.
आरोपींकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी
या प्रकरणानंतर आरोपींकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी चिरंगचे पोलिस अधीक्षक (एसपी) अक्षित गर्ग यांनी सांगितले की, ‘आम्ही सहा आरोपींपैकी पाच आरोपींना अटक केली असून, एक जण अद्याप फरार आहे. त्यापैकी दोन जण दावा करत आहेत की ते अल्पवयीन आहेत, परंतु आम्ही त्यांचे जन्म प्रमाणपत्र तपासत आहोत.’
कुटुंबियांचे नोंदवले जबाब
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणी पुरावे गोळा केले असून, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले आहेत. आम्ही अटक केलेल्या लोकांची देखील चौकशी करत आहोत आणि पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : Vanraj Andekar: सख्ख्या बहिणींनींच घडवून आणली वनराज आंदेकरांची हत्या; पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक