सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. बबीता निसार असं खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. राकेश राम नाईक निसार असं आरोपी पतीचे नाव आहे. पुण्यातील नांदेड सिटी जवळ ही घटना घडली आहे. यावरुन आता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती देताना पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल म्हणाले की, ‘काल नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. लायगुडे मळा परिसरातील समृध्दी सोसायटीत हे जोडपं गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं. आरोपी राकेशनं राहत्या घरात बबीताची हत्या केली. दोघेही मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. दीड वर्षापासून ते पुण्यामध्ये राहायला आलेले होते. घटना घडली त्या दिवशी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. सोमवारी रात्री आरोपी राकेशच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांनी फोनवरून मुलगा राकेशकडे पैसे मागितले, मात्र, पत्नी बबीताने राकेशच्या वडिलांना पैसे देण्यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या नवरा-बायकोच्या वादानंतर बबिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा प्रयत्न फसला. मात्र, यानंतर संतापलेल्या राकेशनं बबीताची हत्या केली.
आरोपीला कसं पकडले
रात्री एक वाजताच्या सुमारास स्वामीनारायण मंदिर समोरून भुमकर पूलाजवळ नागरिकांना एक व्यक्ती संशयितरित्या गाडीवरून काहीतरी घेऊन जात असल्याचं पाहिलं आणि त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बीट मार्शल पोहोचले आणि त्याला पकडलं असता त्याने गाडी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीट मार्शलने या राकेशला पकडलं आणि त्यावेळी राकेश कडे चौकशी करुन पोलिसांच्या ताब्यात दिले.