Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाच्या आमिषाने PSI चा तरुणीवर वारंवार अत्याचार; विविध ठिकाणी लॉजवर नेलं अन्…

उपनिरीक्षक सुभाष चव्हाण व त्याची पत्नी व मुलगा अशी पीडितेचा गर्भपात करुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 01:39 PM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या तरुणीला एका पोलिस उपनिरीक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवत जातीवाचक शिवीगाळ करत तिच्या इच्छेविरुद्ध तीनदा गर्भपात केला. पीडित तरुणीला पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलाने देखील मारहाण केली. या मारहाणीत देखील तिचा गर्भपात झाला. हा प्रकार ७ मार्च २०२५ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शहरात घडला.

उपनिरीक्षक सुभाष चव्हाण व त्याची पत्नी व मुलगा अशी पीडितेचा गर्भपात करुन जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, ७ मार्च २०२५ रोजी पीडित तरुणी मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पोलिस अधिकारी तथा उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्याशी झाली. त्याच दिवशी त्याने पीडितेला फोन केला व तुमचा नंबर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला फोन केल्याची थाप मारली. त्यानंतर तो सतत पीडितेला फोनवर बोलत होता. पोलिस अधिकाऱ्याने तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्यावर सतत अत्याचार केला.

दरम्यान, विश्वास बसल्यानंतर आरोपीने विविध ठिकाणी लॉजवर नेऊन तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने लग्नाचा आग्रह धरल्यावर आरोपीने जोडवे व बनावट मंगळसूत्र घालून तिला पत्नी असल्याचा विश्वास दिला. या काळात ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध पुणे व संभाजीनगर येथे तीन वेळा गर्भपात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पत्नी, मुलाची मारहाण

आरोपीच्या पत्नीने पीडितेला पोलिस ठाण्यात खोटी कबुली देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला व मारहाण केली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद आहे. २८ जानेवारी रोजी पुन्हा आरोपीच्या पत्नीने माझ्या नवऱ्याचा पाठलाग करू नको, बाळ असेल तर पाडून टाक, असे म्हणत मारहाण केली. आरोपीच्या मुलानेही मारहाण केल्याने पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचे नमूद आहे.

शिरूरमध्येही तरुणीवर अत्याचार

दुसऱ्या एका घटनेत, शिरुर शहरातील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला फसवून पीडित युवतीशी लग्न न करता दुसऱ्याच युवतीशी लग्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात शुभम भाऊसाहेब गोसावी (वय २६ वर्षे रा. लाटे आळी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : भयंकर! पतीनेच केला पत्नीच्या Private Part चा Video Viral, प्रसिद्ध होण्याच्या नादात घरच केले उद्ध्वस्त, पोलिसांनी केली अटक

Web Title: Psi repeatedly abused a young girl under the lure of marriage incident in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Abused Case
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास
1

बारामतीत बंद घर चोरट्यांच्या निशाण्यावर! पत्रकाराचे घर फोडले; सोनं, चांदीसह पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप
2

Nalasopara News: मैत्री, प्रेमाचं आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव; नालासोपाऱ्यात तरुणीचा गंभीर आरोप

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त
3

Crime News: उत्तर प्रदेशातून उल्हासनगरमध्ये गांजाची तस्करी; दोन तरुणांना अटक, १५ किलो गांजा जप्त

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
4

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.