पुण्यात गॅस टाक्या जप्त (फोटो- istockphoto)
पुणे: पुण्यासारख्या शहरात गॅसचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत असून, शहराच्या प्रत्येक भागात हे सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे. काळेपडळ पोलिसांनी गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर छापा कारवाईकरून तब्बल ८० टाक्यांसह सव्वा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तर, एकाला अटक केली आहे. शहरात सातत्याने हे प्रकार घडत असताना पोलीस हे गॅस कोठून येतात, त्याचा म्होरक्या कोण आहे, हे शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे यातील मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहचत नाही. असलेली साखळी पुढे जात असल्याची माहिती सूत्रांची आहे, पण पोलीस कारवाईत हात आखडता का घेतात, असा प्रश्न आहे.
निकांत राजकुमार जाधव (वय २२, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभास्पर्श अपार्टमेंट, ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, सद्दाम तांबोळी व त्यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हांडेवाडी रस्त्यावरील माऊली गॅस सर्व्हिसेसजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये घरघुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती मिळाली.
लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमित शेटे व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. तेव्हा पोलिसांना निकांत जाधव याला पकडले. पोलिसांना काही भरलेल्या घरघुती गॅस टाक्या आणि काही छोट्या रिकाम्या टाक्या, वजन काटा व इतर साहित्य असे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ह्या टाक्या नातेवाईक व ओळखीतील व्यक्तींकडून घेतल्याचे सांगितले आहे. तो घरघुती गॅस टाक्यांमधून छोट्या गॅस टाक्यात गॅस भरणा करत होता. त्याची अवैधरित्या विक्री केली जात होती.
लोणी काळभोर येथे गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त
घरगुती गॅस सिलेंडरमधून एका लोखंडी नोझलच्या सहाय्याने अवैध व धोकादायक पद्धतीने गॅस काढून त्याची छोट्या-मोठ्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्याचा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 6 च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मदन माधव बामने (वय 20, रा. महादेव मंदिराजवळ, लोणी काळभोर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शेखर बाळासाहेब काटे (वय 32) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.