वैष्णवीचा पती, सासू आणि नणंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Vaishnavi Hagawane Case In marathi: २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. यामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नंनद करिश्मा यांचा समावेश आहे. आरोपींच्या चौकशीदरम्यान, वैष्णवीला ज्या हत्यारांनी मारण्यात आले होते ते जप्त करणे आवश्यक आहे, असे सरकारी वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. यामध्ये काठ्या आणि वस्तूंचा समावेश आहे. तसेच, हुंड्यात मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू जप्त करण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.
पोलिसांनी या आरोपी तिघांना हजर केल्यानंतर न्यायाधीशांकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांना यापूर्वी दोनवेळा पोलीस कोठडी मागितली होती. पोलिसांना आता आरोपींकडे जी चौकशी करायची होती ती पूर्ण झालेली आहे. पुन्हा गरज वाटली तर पोलीस या आरोपींची पोलीस कोठडी मागू शकतात. मात्र, आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानं तिघांना येरवडा कारागृहात पाठवण्यात येईल. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार निलेश चव्हाणला पकडल्याचा फोन करुन दिशाभूल करणाऱ्या संतोष दत्तात्रय गायकवाडला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचं फोन नंबरच्या आधारे लोकेशन शोधून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
यावेळी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन वकिलाने केलेल्या सर्व दाव्यांचे खंडन केले. त्यांनी माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोंडे उडवण्याचे काम केले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच मी माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला नाही. उलट आरोपीलाच दीड लाखांचा मोबाईल घेऊन दिला, असा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.
प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी वकिलांकडून असे आरोप करण्यात आल्याचे अनिल कस्पटे यांनी सांगितले. त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. सप्टेंबर २००९ मध्ये वैष्णवीच्या पतीने मोबाईल मागितला होता. त्यानुसार १ लाख ५२ हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला होता. त्याचे हप्ते अजूनही फेडत असल्याची माहिती कस्पटे यांनी दिली.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कोर्टात आरोपींची बाजू मांडताना वकिलांनी गंभीर आरोप केले होते. वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणे कुटुंबाला संशय होता. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वकिलांनी केला होता. आपल्याकडे पाच कोटींच्या गाड्या असून त्यांना गाडी कशाला मागतील, असेही वकिलांनी म्हटले होते. हे दावे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी खोडून काढले आहेत.