पंजाब नतंर सगळ्या देशाच्याच डोक्याला ताप ठरलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या पंजाबमधून पळून गेला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे शक्त ते सगळे प्रयत्न सुरू असताना एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या 11 दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलीस (Punjab Police) आता ड्रोनची (Dron) मदत घेत आहेत. पंजाब पोलिसांनी गुरुवारी होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात ड्रोन तैनात केले आहेत.
[read_also content=”कानपूरच्या सर्वात मोठ्या कापड बाजाराला लागली आग! 6 कॉम्प्लेक्समधील 800 हून अधिक दुकानं भस्म, लष्कर आलं मदतीला https://www.navarashtra.com/india/kanpurs-biggest-textile-market-caught-fire-over-800-shops-in-6-complexes-were-burnt-down-nrps-379920.html”]
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला अमृतपाल सिंग अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभुमीवर पंजाबमध्ये हाय अर्लट जारी करण्यात आला आहे. मारनैन गावात आणि आसपास तैनात असलेले पोलीस वारिस पंजाब डेचे प्रमुख अमृतपाल यांच्या शोधात वाहनांची तपासणी करत आहेत. पोलिसांनी परिसरात पुन्हा शोध मोहीम सुरू केली आणि गावात ड्रोन तैनात केले. मात्र, याबाबत पोलिस विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
पोलिसांनी घरोघरी शोधमोहीम सुरू केली आहे, मात्र अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी अटक केलेल्या व्यक्तीच्या सुटकेच्या मागणीसाठी अमृतसरजवळील अजनाळा पोलिस स्टेशनवर धडक दिली होती. या घटनेच्या सुमारे तीन आठवड्यांनंतर, 18 मार्च रोजी, पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या खलिस्तान समर्थक संघटनेच्या सदस्यांविरुद्ध कारवाई सुरू केली ‘वारीस पंजाब दे’. तेव्हापासून अमृतपाल फरार आहे. तो 18 मार्च रोजी जालंधर जिल्ह्यातून फरार झाला होता.