Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा… लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

Suicide Case : साखरपुडा झाला आणि मुलाने खरं रुप दाखवायला सुरुवात केली. फोनवर अश्लील बोलणं, हुंड्याची मागणी आणि शारिरीक संबंधासाठी दबाव या सर्व गोष्टींना कंटाळून अखेर लग्नाआधीच मुलीने ॲसिड आपलं आयुष्य संपवलं. कुटुंबियांनी न्यायची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 30, 2026 | 11:10 AM
हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा... लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील भाषा... लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

Follow Us
Follow Us:
  • लग्नाआधीच तरुणीवर मानसिक दबाव आणि सततचा त्रास वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे परिस्थिती गंभीर बनली.
  • उपचारादरम्यानही तरुणीने आयुष्यासाठी झुंज दिली, मात्र अखेर दुर्दैवी अंत झाला.
राजस्थानच्या कराैली भागातील एका तरुणीने लग्नाआधीच स्वत:चे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा झाला होता, पण यानंतर होणारा नवरा तिचा मानसिक छळ करत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील बोलणे यामुळे तरुणी फार तणावात होती. अशातच या सर्व जाचाला कंटाळून तिने ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. माहितीनुसार, लग्नाची तारीख ठरली होती आणि होणारा नवरा इंजिनिअर होता. ॲसिड पिल्यानंतर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले ज्यानंतर दोन महिने ती मृत्यूशी झुंज देत राहिली. अखेर २५ मे रोजी तिचे निधन झाले. तिच्यावर जयपूर रुग्णालयात आणि एम्समध्ये उपचार सुरु होते. पोलिस या घटनेचा तपास करत असून कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे.

Solapur Crime: ‘तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण… हातावर आरोपींची नावे लिहित 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव रिना (२६) आहे. पोलिस ठाण्यात आता आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरनुसार, रीनाचे लग्न ६ डिसेंबर २०२५ रोजी ललित मीनासोबत ठरवण्यात आले होते. साखरपुड्याच्या वेळीही वर पक्षाकडून १,२१,००० रुपये घेण्यात आले होते. यानंतर ललीत रिनाशी फोनवर संवाद साधू लागला. तो काॅलवर तिच्याशी अश्लील गप्पा मारायचा. रिना तिची सीटीईटी (CTET) परीक्षा देण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी जयपूरला आली असता त्याने तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला.

हुंड्याची धमकी

माहितीनुसार, अधिक हुंडा मिळवण्यासाठी ललित रिनाला सतत धमकावत होता. त्यांचे लग्न ४१ लाख रुपयांमध्ये ठरवण्यात आले होते पण यानंतरही ललित रिनाकडे अधिक पैशांची मागणी करत होता. तो रिनाला धमकवत असायचा की, त्याने मनात आणले तर तो एका इंजिनीअर किंवा डाॅक्टर मुलीसोबतही लग्न करु शकतो. रिनाने जेव्हा ही बाब तिच्या आईला सांगितली तेव्हा कुटुंबाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Pune Crime: पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

यानंतर १५ मार्च रोजी ललितने लग्न करण्यास नकार दिला. रीनाने आणि कुटुंबाने ललितला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने काही ऐकलं नाही. परिणामी २२ मार्च रोजी रिनाने ॲसिड पिऊन स्वत:चे आयुष्य संपवले. तब्बल ४० दिवस ती रुग्णालयात उपचार घेत होती पण २५ मे रोजी तिने श्वास सोडला. रिनाच्या कुटुंबाने आता न्यायाची मागणी केली असून पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. रिनाने बीएससी बीएडमध्ये शिक्षण घेतले असून तिला भविष्यात शिक्षिका बनायचे होते. मात्र याआधीच तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. उपचारावेळीच तिची CTET परिक्षेचा निकाल लागला होता ज्यात ती उत्तीर्ण झाली.

 

Web Title: Rajasthan woman dies after consuming acid over dowry harassment before marriage marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • crime news
  • rajasthan
  • Suicide case

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल
1

चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा
2

Karnataka Crime : ‘तू जास्त पीस का खाल्ले?’ चिकनवरून वाद अन् मित्रानेच पोटात खुपसला सुरा

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…
3

धक्कादायक ! बहिणीशी बोलत नसल्याने पतीने केली पत्नीची हत्या; आरडाओरड करणाऱ्या स्वत:च्या मुलाला…

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण
4

Pune Crime : तंबाखू न दिल्याचा राग अनावर; तरुणाला लाथाबुक्क्यांनी अन् लोखंडी रॉडने मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.