काय घडलं नेमकं?
अल्पवयीन पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत ईश्वरपूरमध्ये राहते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतिक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतिक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. तिथे दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी तिने विरोध केला असता तिला त्यांनी मारहाणही केली. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.
विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर
यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले आणि ईश्वरपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता तिने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतिक दिनकर महापुरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. एवढेच नाही तर त्याच्या विरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सांगलीत भीषण अपघात! बाइकवरून जाताना डंपरची धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर
सांगली जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका ३२ वर्षीय महिलेचा जागीच जीव गेला. तर महिलेचा पती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज- पंढरपूर मार्गावर सिव्हिल हॉस्पिटलसमोर आज सकाळी झाली. डंपरने बाईकला जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली. ही संपूर्ण दुर्घटनेचा घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेननंतर डंपर चालक पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला तातडीने पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
चंद्रपुरातील किडनी प्रकरण समोर येताच पोलिसांकडून मोठी कारवाई; सहा जणांवर गुन्हा दाखल करून…
Ans: सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर परिसरात.
Ans: पोक्सो कायद्यानुसार गंभीर गुन्हा.
Ans: दोन्ही आरोपी अटकेत; पुढील तपास सुरू.






