काय घडलं नेमकं?
सबा असद खान (वय 24, रा. टाउनहॉल, भडकलगेट, छत्रपती संभाजीनगर) असे पीडित महिलेचे नाव आहे. तिने बेगमपुरा पोलिस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. तर घडलं असं की, पीडितेचा विवाह ११ जून २०२३ रोजी असद अय्युब खान (वय 28, रा. सैलाबनगर, नांदेड) यांच्याशी झाला होता. विवाहनंतर सुरुवातीला दोन ते तीन महिने सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली होती. मात्र त्यांनतर पती असद आणि सासरे अय्युब यांनी हुंड्याचे उरलेले पाच लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी सुरू केली.
मात्र वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने पैसे आणणे शक्य नाही असे तिने सांगितले. तेव्हा पती, सासरे, सासू रेश्मा, दीर अरबाज व सोहेल, नणंद सुमैय्या आणि नंदोई मोहसीन यांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत “जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देण्यात आली. नंतर ऑगस्टच्या २०२४ मध्ये पीडित गर्भवती झाली. हे माहिती होता सासरच्यांनी तिला मारहाण केली. ती प्रसूतीसाठी माहेरी आली. तिथे तिला मुलगी झाली.
दरम्यान तिच्या पतीने “मला मुलगा हवा होता, मुलगी नको. तू तिकडेच राहा. इकडे आलीस तर तुला जिवंत मारून टाकीन,” अशी धमकी दिली. एवढेच नाही तर तीन वेळा “तलाक, तलाक, तलाक” असे म्हणत तिहेरी तलाक दिले. असे तारकारीत नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासून पीडित महिला आपल्या आई-वडिलांकडेच वास्तव्यास आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आता काय कारवाई करण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र तिहेरी तलाक देशात कायदेशीर बंद आहे. तरीदेखील अशे प्रकार अजूनही देशात घडत असल्याने कायद्याचा उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे महिलांवरील सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Solapur Crime: बापच ठरला भक्षक! पोटच्या अल्पवयीन लेकीवर अत्याचार; न्यायालयाचा कडक दणका
Ans: छत्रपती संभाजीनगरमध्ये; 28 जानेवारी रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Ans: हुंड्यासाठी छळ, गर्भवती असताना मारहाण, मुलगी झाल्यावर धमकी आणि फोनवरून तिहेरी तलाक दिल्याचा आरोप.
Ans: पतीसह सासरे, सासू, दीर, नणंद व नंदोई अशा एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल.






