Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: आंतरजातीय विवाहाचा भयानक शेवट! चारित्र्य संशयातून पतीने 20 वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने हत्या

सांगलीच्या विटा येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी रॉडने 20 वर्षीय श्रद्धा लोटकेची निर्घृण हत्या केली. आंतरजातीय प्रेमविवाहानंतर वाद वाढत गेले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 02:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्य संशय आणि कौटुंबिक वादातून हत्या
  • लोखंडी रॉडने मारहाण; पत्नीचा जागीच मृत्यू
  • आरोपी पती अटकेत; पोलीस तपास सुरू
सांगली: सांगली येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आणि स्वतःच्या अनैतिक छंदाला होणाऱ्या विरोधाला कंटाळून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मृत महिलेने आणि आरोपी तरुणाने प्रेमविवाह केला होता. मात्र गेल्या काही काळापासून यांच्यात दुरावा निर्माण झाला होता आणि सततच्या वादाला कंटाळून आणि संशयातून त्याने आपल्याच पत्नीची हत्या केली. ही घटना विट्यातील सुतारकी मळा परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

घरगुती वादातून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अविनाश असे आहे तर मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव श्रद्धा आहे. हे दाम्पत्य आपल्या मुलासह विट्याच्या यात्रेत फिरायला गेले होते. तिथून मध्यरात्री घरी परतल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार वादावादी सुरु झाली. हळूहळू हा वाद विकोपाला गेला, पहाटे ४च्या सुमारास अविनाशने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉडने उचलून श्राद्धाच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोक्यावर आणि उजव्या हातावर वर्मी घाव घातले. या भीषण हल्ल्यात श्राद्धाच्या जागीच मृत्यू झाला. या निर्घृण कृत्यानंतर आरोपीने अत्यंत थंड डोक्याने आपल्या लहान मुलाला एका मित्राकडे नेऊन सोडले आणि काहीतरी खोटे कारण सांगून तिथून पलायन केले.

ही घटना सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा श्रद्धाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. रीतसर पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. विटा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या हत्येमागील कारण अत्यंत क्लेशदायक असल्याचे समोर आले आहे. मृतक श्रद्धा आणि आरोपी अविनाश यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. आरोपीला तृतीयपंथीयांच्या नाद होता आणि श्रद्धा या गोष्टीला कडाडून विरोध करत होती. या वादासोबतच अविनाश स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत होता, ज्याचा शेवट अखेर या हत्येत झाला.

आरोपी अटकेत

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी दीपाली शशीकांत साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या वर्दीवरून गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(V)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटस टोलनाक्याची तोडफोड करणे तरुणांना भोवलं; यवत पोलिसांत गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील विटा शहरात.

  • Que: हत्येचे मुख्य कारण काय होते?

    Ans: पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि सततचे वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला.

Web Title: Sangli crime the tragic end of an inter caste marriage husband murders 20 year old wife with an iron rod over suspicion of character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.