गोपाल बदनेचा मोबाईल सापडेना; पुरावे, धागेदोरे लपवण्याचा करतोय प्रयत्न
Satara Doctor Death case: साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी निलंबित PSI गोपाल बदने याला पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशीदेखीस सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली तर गोपाल बदने याने पोलिसांना सरेंडर केले. पण सरेंडर होण्यापूर्वी गोपाळ बदने ने मोबाईल लपवला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना त्याचा मोबाईल अद्यापही सापडलेला नाही. या मोबाईलमध्ये काही महत्त्वाचे पुरावे, धागेदोरे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गोपाल बदनेने सरेंडर होण्यापूर्वी त्याचा मोबाईल कुठे लपवला आहे. याबाबत त्याने कबुलीही दिली आहे. पण त्याने तो मोबाईल कुठे लपवला आहे, याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. गोपालच्या मोबाईलमध्ये असलेले मेसेज, कॉल डिटेल्स आणि महत्त्वाचे पुरावे असल्यानेच त्याने तो लपवला असावा, त्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात.
Thane News: धक्कादायक! मैत्रिणीशी भांडण झालं, रागाच्या भरात १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला जाळलं
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी प्रशांत बनकप आणि गोपाल बदने दोघेही डॉक्टरच्या संपर्कात होते.संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वीही प्रशांत बनकरने त्यांच्याशी संवाद साधला होता. हे डिजीटल पुराव्यांच्या माध्यमातून समोर आले आहे. या दोन्ही आरोपींनी डॉ. मुंडे यांच्या नियमित संपर्कात असल्याची कबुलीही दिली आहे. प्रशांत बनकरची पोलिस कोठडी संपली असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.मुंडे प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने यांच्या संपर्कात होत्या. प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांशीही डॉ. मुंडे याचे बोलणे आणि चॅटिंग सुरु होती. पण गोपाल बदणे याने पोलिसांना सरेंडर होण्यापूर्वी मोबाईल लपवला असून तो कुठे लपवलाय बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मोबाईलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असल्याने तो पुरावे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
फलटण पोलिस ठाण्यातील बलात्कार प्रकरणात संशयित असलेला पीएसआय गोपाल बदने सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वर्दीवर नसलेला गोपाल बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, अशा संशयित अधिकाऱ्याने अशा प्रकारे वागणे योग्य आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली, चाकणकर म्हणाल्या, “ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. संबंधित डॉक्टर युवतीला न्याय मिळावा यासाठी मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दररोज संपर्कात राहून चौकशीची माहिती घेत आहे.”
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, मृत डॉक्टर महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादाबाबत तक्रार केली होती. मात्र, आयसी कमिटीने या वादाचे समाधान करून प्रकरण मिटवले होते. आत्महत्येच्या दिवशी ती प्रशांत बनकरच्या संपर्कात होती आणि त्याला अनेक वेळा फोन केला होता, परंतु त्यादिवशी त्याचा मोबाईल बंद होता. त्या संदर्भातील सर्व कॉल रेकॉर्ड आणि सीडीआर रिपोर्ट्स पोलिसांकडून मागविण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.






