उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने आपल्या सात महिन्याच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने आपल्या चिमुकल्या आधी हवेत फेकलं, बाळाला झेलता न आल्याने तो खाली पडला. त्यामुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर त्याला उलटे पकडून गावभर हिंडावले. चिमुकल्याचा बाप तेव्हा दारूच्या नशेत होता. ही भयानक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेर जिल्ह्यात घडली आहे.
या भयंकर घटनेनं अख्ख गाव सुन्न झाले आहे.
नेमकं काय घडलं?
सौरभ नावाच्या एका निष्पाप मुलाचा त्याच्या वडिलांच्या हातून वेदनादायक मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावरही वायरल होत आहे. मतोली पोलीस स्टेशन परिसरातील रेवाना गावातील रहिवासी सतीश खुर्चीवर बसून आपल्या निष्पाप मुलासोबत खेळत होता. दारूच्या नशेत सतीशने अचानक आपल्या सात महिन्यांच्या मुलाला पाठीवर हाताने मारायला सुरुवात केली. यादरम्यान त्याने मुलाला वर फेकले. मात्र त्याला मुलाला झेलता न आल्याने बाळ जमिनीवर पडले. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. मुलाला उपचारासाठी नेण्याऐवजी त्याने पडलेल्या मुलाला पाहण्याऐवजी सतीश काही वेळ डोक्यावर हात ठेवून बसला आहे.
मृतदेह गावात फिरवले
नंतर एका हाताने मुलाला उलटे धरून तो घराबाहेर पडला आणि गावाकडे जाऊ लागला. तो नुकताच थोडा दूर गेला होता तेव्हा एका वृद्ध महिलेने मुलाची अवस्था पाहून सतीशकडून त्याचे स्वतःचे मूल हिसकावून घेतले. मग ती मुलाला त्याच्या आईकडे घेऊन आली. त्यावेळी त्यांनी मुलाला पाहिले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले.
मृत मुलाच्या काकाने लालजी प्रसाद यांनी त्याचा धाकटा भाऊ सतीश कुमार याच्या विरुद्ध मितौली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सतीशला अटक करून न्यायालयात पाठवले आहे. बाळाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. सांगितले जात आहे की सतीशला दोन मुले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा त्याच्या आजी- आजोबांच्या घरी आहे.