फोटो सौजन्य- pinterest
सप्टेंबर महिन्यामध्ये ग्रह आणि नक्षत्रांसह अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच या महिन्यात पितृपक्षाची देखील सुरुवात होत आहे. सर्वांत पहिले संक्रमण ग्रहांचा राजा मंगळ तूळ राशीमध्ये 13 सप्टेंबर रोजी करणार आहे. त्यानंतरचे दुसरे संक्रमण 14 सप्टेंबर रोजी शुक्र सिंह राशीत करणार आहे. मंगळ आणि शुक्र नंतर बुध ग्रह 15 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर शेवटचे संक्रमण 16 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत करणार आहे. सप्टेंबर महिन्यात या 4 ग्रहांचे होणारे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्ही घर, वाहन, बँक बॅलन्स यासह या राशींच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. सप्टेंबर महिन्यातील ग्रहांच्या संक्रमणाचे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या
सप्टेंबर महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला भाऊ आणि मित्रांकडून चांगला पाठिंबा मिळेल. या महिन्यात तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. या महिन्यात तुमच्या नात्यात सुधारणा दिसून येईल. जर तुम्ही नवीन करिअरला सुरुवात करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना चांगला आहे.
शुक्र, बुध, मंगळ आणि सूर्य यांच्या राशीमध्ये सप्टेंबर महिन्यात होणारा बदल सिंह राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुमच्या सर्व चिंता दूर होतील. मुलांचे आरोग्य सुधारेल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. नशिबाची साथ मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात मालमत्तेत गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते.
मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र यांच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होतील. आरोग्य चांगले राहील. तसेच या महिन्यात प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती चांगली होईल. मानसिक आनंद मिळेल.
बुध, शुक्र आणि मंगळाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप खास असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस खूप चांगला असेल.
बुध, सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्या राशीत होणारा बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या काळात तुम्ही घर आणि वाहन खरेदी करु शकता. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकला असाल तर अडथळे दूर होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)