उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी पती पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. त्या आधी त्यांनी मुलाला विष दिले आणि त्याची हत्या केली. सावकारांच्या जाळ्यात अडकल्याने आणि कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. हॅन्डलूम व्यापारी सचिन ग्रोव्हर (36) आणि त्याची पत्नी शिवांगी (34) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा असे मृतकाचे नाव आहे. या दाम्पत्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमधील दुर्गा एन्क्लेव्ह कॉलनीत घडली आहे. त्यांनी आत्महत्या करणाऱ्या आधी एक १३ पाणी सुसाईड नोट लिहून ठेवले होते. त्यात व्याजावर घेतलेल्या कर्जाव्यतिरिक्त इतर देणींचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.
प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराला आला राग; प्रेयसीचा गळा चिरून केली हत्या
सचिन ग्रोव्हर सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या जाळ्यात अडकत राहिला, जे त्याने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी घेतले होते. त्याला पहिल्यांदा मित्र म्हणून भेटलेले सावकार त्याला व्याज वसूल करण्यासाठी त्रास देत होते. व्याज देण्यास असमर्थतेमुळे त्यांनी त्याच्या भावाची बाईक आणि त्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत कार ताब्यात घेतली होती. उद्योग केंद्राकडून घेतलेल्या कर्जाचे अनुदानही अडकले होते. यामुळे त्रासलेल्या हातमाग व्यावसायिक सचिन ग्रोव्हर याने टोकाचे पाऊल उचलत स्वतः सह पत्नी आणि मुलाचा दुर्दैवी अंत केला आहे. १३ पानांचा सुसाईड नोट पोलिसांना सापडला आहे.
१३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय?
या सुसाईड नोटमध्ये सचिनची पत्नी शिवांगीनेही तिच्या आईसाठी मजकूर लिहिला आहे. त्यात तिने लिहिले आहे की, “माफ करा आई, मी जे काहीही केले आहे, त्यासाठी मला माफी नाही. माझ्या मृत्यूनंतर माझी गाडी कर्जमुक्त होईल. सध्या ती एका ठिकाणी गहाण आहे. ती सोडा आणि साडेतीन लाख रुपयांना विकून टाका. मम्मी, कोणाचीही भीती बाळगण्याची किंवा दबावाखाली येण्याची गरज नाही. माझे घर विकून कर्ज फेड. आता सर्व काही तुमचे आहे. तुम्ही आम्हाला द्वेषाने लक्षात ठेवावे, वाईट आठवण म्हणून विसरून जावे असे आम्हाला वाटत नाही. -आय लव्ह यु फ्रॉम शिवांगी, सचिन, फतेह” असे या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
शिवांगीने पुढे लिहिले आहे की, कंपनीतील गाडी विकून टाका, तुम्हाला चांगले पैसे मिळतील. थोडा वेळ लागेल, पण सर्व काही ठीक होईल. जर सर्वांनी थोडा धीर धरला असता तर आज हे घडले नसते. सचिनने अनेक चुका केल्या आहेत, परंतु त्याने जाणूनबुजून काहीही केले नाही. काही लोक माझ्यामुळे अडचणीत आले आहेत. मला माफ करा, माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. आता जे घडत आहे ते बरोबर असू शकत नाही, कृपया ते मॅनेज करा, कृपया माझा द्वेष करू नका आणि माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या कुटुंबाने मला खूप पाठिंबा दिला. ही त्यांची चूक नाही. शिवांगीने सचिनच्या कुटुंबाबद्दलही लिहिले आहे आणि त्यांच्यावर त्याला पाठिंबा न देण्याचा आरोप केला आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिलेली नावे पोलिसांकडून लपवण्याचा प्रयत्न?
सचिनने सुसाईड नोट १३ पानांच्या न खूप तपशीलवार लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने त्याला त्रास देणाऱ्यांची आणि ज्यांनी त्याला मदत केली नाही त्यांची नावे लिहिली आहेत. व्यापाऱ्याच्या मोबाईलमधून पोलिसांना सुसाईड नोटची पाने सापडली आहेत, परंतु पोलीस ती सार्वजनिक करत नाहीत. असा आरोप केला जातोय.
सुसाईड नोटमध्ये सावकारांची नावे लिहिली असल्याचे सांगितले जाते. सावकार अनेक मोठ्या लोकांचे जवळचे असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत पोलिसांचा दृष्टिकोन हलगर्जी झाला आहे. सुसाईड नोटचा अभ्यास केल्यानंतरच ते काहीतरी सांगतील असे पोलिस सांगत आहेत. मृताच्या कुटुंबीयांकडेही सुसाईड नोट आहे.