बीड: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास झाली आहे.
6 महिने शारीरिक संबंध नाही, तरी अचानक पत्नी गर्भवती; कळताच नवऱ्याने गर्भासह….
अपघातात मृत्यू झालेल्या हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते अशी प्राथमिक माहिती आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले आहे. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं असून काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून, पोलीस तपास सुरु आहे. दरम्यान, अपघातात नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी.
चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने रिक्षाला धडक दिली आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक व रिक्षाचा हा भीषण अपघात राजुरा तालुक्यात घडला आहे. जखमी लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात हा भीषण अपघात घडला आहे. एक ट्रक राजुरा येथील पाचगाव येथे जात होता. तर रिक्षा समोरच्या दिशेने येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेला येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षातील टीन जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रातील मुलांना १६ मुलींने ओढलं जाळ्यात, ‘पिंक गँग’चा पोलिसांनी धाड टाकत केला पर्दाफाश
‘पिंक गँग’ ही एक मुलींची टोळी आहे. या १६ मुलींना फोन कॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मुलीना अटक केली असून त्यांच्या सोबत दोन पुरुषांना देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडे असणाऱ्या मुजफ्फरनगर इथे मंगळवारी समोर आली. पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे.