भोपाळ : जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये (Dipression) असता तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, किंवा तसा सल्ला तुम्हाला दिला जातो. मात्र आता तर डॉक्टरही तणावाखाली (Doctors Also In Dipression) असल्याचं समोर यायाला लागलंय. मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी असलेल्या भोपाळमध्ये (Bhopal) असीच एक दुर्दैवी घटना समोर आलीय.
वैद्यकीय महाविद्यालयात आकांक्षा (Akanksha) नावाच्या ज्युनियर डॉक्टरनं हॉस्टेलमध्ये आपल्या खोलीतच आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनं मेडिकल कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये राहणारे सगळेच हादरलेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोटही मिळालीय त्यात आकांक्षाने तिच्या मृत्यूचं कारणही लिहून ठेवलंय.
[read_also content=”Mukesh Ambani चं ठरलं! घेतलाय धाडसी निर्णय, मुलांवर सर्वकाही सोपवून करणार नवीन व्यवसाय; वयाच्या ६५ व्या वर्षी Jio सारखी झेप घेण्याची तयारी https://www.navarashtra.com/business/mukesh-ambani-will-be-starting-new-innings-focusing-on-reliance-industries-green-energy-business-nrvb-359499.html”]
ज्युनियर डॉक्टर असलेल्या आकांक्षानं बुधवारी संध्याकाळी हे दुर्दैवी पाऊल उचललं. स्वताचं जीवन संपवण्याचा निर्णय तिनं घेतला. पोलिसांना घटनास्थळी इंजेक्शन आणि सिरिंज सापडली आहे. आकांक्षाने औषधांचा ओव्हरडोस (Drug Overdose) घेऊन हे आत्मघाती पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून पोस्टमार्टेम रिपोर्टनंतरच या प्रकरणात नेमकं कशामुळे आत्महत्या केली, याचा खुलासा होऊ शकणार आहे. त्यापूर्वी बुधवारी सकाळी आकांक्षानं आपल्या डजिपार्टमेंटला फोन करुन आज आपण येऊ शकणार नाही, असं कळवलं होतं.
२४ वर्षांची आकांक्षा भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होती. ती पहिल्या वर्षाला होती. आकांक्षा ग्वाल्हेरच्या दीनदयाल नगरमध्ये आदित्यपुरमची रहिवासी होती. ग्वाल्हेरमधूनच तिनं एमबीबीसचं शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि त्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी भोपाळमध्ये आली होती. आकांक्षाचा दरवाजा सकाळपासून बंद होता, असं तिच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींनी सांगितलंय.
तिची प्रकृती नीट नसल्यानं ती आराम करत असावी, असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र संध्याकाळपर्यंत दरवाजा उघडला गेला नाही, हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनींनी ही बाब गार्डच्या कानावर घातली. गार्डनं कॉलेज व्यवस्थापन आणि पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला, त्यावेळी आकांक्षाचा मृतदेह पोलिसांना सापडला.
[read_also content=”हुकुमशाहा किम जोंग उन आजारी, आता ९ वर्षांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य?, मुलीला आणि बहिणीला देतायेत ट्रेनिंग https://www.navarashtra.com/world/update-dictator-kim-jong-un-sick-now-9-year-old-daughter-will-rule-north-korea-training-to-daughter-and-sister-nrvb-359470.html”]
पोलिसांना तिच्या खोलीतू एक सुसाईड नोट मिळालीये, त्या लिहिलंय, मी इतका तणाव सहन करु शकत नाही. मी इतकी मजबूत नाही. त्यामुळे सॉरी मम्मी-पप्पा, मित्रांनाही सॉरी, काय करु, मी इतकी स्ट्राँग नाही. सगळ्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. मी वैयक्तिक कारणानं हे पाऊल उचलते आहे.