Vaishnavi Hagavane case: दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीच्या पतीसह सासू, सासरे, नणंद आणि दीर अशा पाच जणांना अटक करण्याती आली. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात असून, पोलिस या प्रकरणाचा तपास वेगाने करत आहेत.
या प्रकरणात आता एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. महिला व बालकल्याण समितीने या आत्महत्येप्रकरणी आपला प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवालात वैष्णवी हगवणे हिने केलेली आत्महत्या ही प्रत्यक्षात हुंडाबळी असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या अहवालानंतर या प्रकरणातील संबंधित सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
India vs England 4th Test : गौतम गंभीरच्या कोचिंगवर भज्जी नाराज! हरभजन सिंगने केली मोठी मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, महिला व बालकल्याण समितीने दिलेल्या अहवाल सादर केला आहे. या अहवालात वैष्णवीने सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळामुळेच आत्महत्या केल्याचे निष्पण्ण झाले आहे. इककेच नव्हे तर हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे पोलिस अधिकारीजालिंदर सुपेकर यांचीदेखील चौकशी करण्याचे आणि त्यांच्या पत्नीलाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची शिफारस अहवालामध्ये करण्यात आली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी महिला व बालक हक्क आणि कल्याण समितीने तपास अहवाल तयार केला असून तो राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्षपद भाजप आमदार मोनिका राजळे यांच्याकडे आहे. या अहवालात वैष्णवीच्या मृत्यूच्या अनुषंगाने राज्यातील महिलांवरील अत्याचार तसेच हुंडाबळीप्रकरणांची चौकशी करण्यात आली. अहवालात वैष्णवीची आत्महत्या ही हुंडाबळी असल्याचं ठामपणे नमूद करण्यात आलं आहे.
महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन; CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या
विशेष म्हणजे, वैष्णवीची जाऊबाई मयूरी हगवणे हिने वेळेवर या प्रकरणाची दखल घेतली असती, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, असं निरीक्षणही या समितीने नोंदवलं आहे. तसेच, मयूरीने दिलेली तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारसही अहवालामध्ये स्पष्टपणे करण्यात आली आहे.हा अहवाल पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
याशिवाय या समितीला या प्रकरणात आणखीही काही माहिती मिळाली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची चौकशी करताना
वैष्णवी हगवणेला हुंड्याच्या माध्यमातून हगवणे कुटुंबीयांनी ब्रॅण्डेड कार, चांदीची भांडी, सोने, रोख रक्कम अशा विविध वस्तू आणि पैसे घेतल होते, त्याचे पुरावेदेखील या समितीने मिळवले आहेत. वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानुष मारहाण, छळ झाल्याचेही समोर आले आहे. हे प्रकरण पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीचे असल्याचेही या अहवालात नमुद करण्यात आले आहे. यासोबतच जालिंदर सुपेकर यांचीदेखील चौकशी करून या प्रकरणात त्यांचाही त्यांचा सहभाग आढळल्यास निलंबित करून सहआरोपी करण्यात यवे. जालिंदर सुपेकरांच्या बायकोच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचे आढळून आल्याने तिला या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे. तसेच प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.