Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या श्रीनिवास बालाजी पवार हत्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ तुषार आगलावे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 12:10 PM
श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली 'ही' मोठी शिक्षा

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील आमराबाद तांडा येथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या श्रीनिवास बालाजी पवार हत्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश-१ तुषार आगलावे यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुख्य आरोपी रणजीत अंगूर पवार याला ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड, तर अन्य तीन आरोपींना प्रत्येकी एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. डुकराच्या शिकारीच्या मटणाच्या पैशांवरून झालेल्या क्षुल्लक वादातून ही घटना घडली होती.

२८ फेब्रुवारी २०२२ रोजी आरोपी रणजीत पवार व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी बालाजी हारलाल पवार यांच्या घरासमोर बेकायदेशीर जमाव केला. यावेळी त्यांनी श्रीनिवास पवार याला शिवीगाळ करून काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान श्रीनिवासचा मृत्यू झाला. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३/२०२२ दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने मुख्य आरोपी रणजीत अंगूर पवार याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (भाग २) अन्वये ७ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच अंगुर बाटु पवार, मीनाबाई अंगूर पवार आणि वंदनाबाई अंगुर पवार या तिघांना प्रत्येकी एक वर्षाचा कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा  : कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

पुराव्यामुळे शिक्षा 

पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रायल मॉनिटरिंग सेल’च्या प्रभावी समन्वयामुळे तसेच तपासातील भक्कम पुराव्यांमुळे आरोपींना शिक्षा मिळाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कपील आगलावे यांनी केला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मोहम्मद अब्बास यांनी न्यायालयात सरकारच्या वतीने बाजू मांडली. पोलीस उपनिरीक्षक नईम खान आणि पोलीस हवालदार आर. जी. गुटलवाड यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.

हे सुद्धा वाचा : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

Web Title: The court has handed down severe sentences to the accused in the shrinivas pawar murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
1

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
2

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
3

कोल्हापुरात भररस्त्यात नगरसेविकेचा विनयभंग; अश्लील हावभाव करत शिवीगाळही केली, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर
4

Jalgaon News: गोमांस आढळताच मनपाची धडक कारवाई! अनधिकृत गोडाऊनवर चालला बुलडोझर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.