Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव तालुक्यातील खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकत केली कारवाई

धाराशिव तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 12:30 AM
अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

अडीच कोटींच्या फसवणुकीतील आरोपीला फिजीत जाऊन बेड्या; इंटरपोलच्या रेड नोटिशीनंतर कारवाई

Follow Us
Follow Us:

धाराशिव : धाराशिव तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक केली आहे. पोलिसांना पाहताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्यात हजर केले.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा चिंचपूर खुर्द येथील खून प्रकरणाची नोंद आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी दीपक विक्रम गरड हा घटनेनंतर फरार होता. दरम्यान, आरोपी कर्नाटक बसल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार विशेष पथक बसवकल्याण येथे रवाना करण्यात आले.

बसवकल्याणातून मुख्य आरोपीला अटक

माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पथकाने तत्परता दाखवत त्याचा पाठलाग केला आणि काही अंतरावर त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आंबी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, 15 शस्त्र परवाने रद्द; तब्बल 68 जणांचे अर्ज फेटाळले

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर तसेच पोलीस अंमलदार रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या अटकेमुळे चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. विविध कारणांमुळे १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांचे अर्जही नामंजूर करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेल्या तपासणीत काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे तसेच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले. यानंतर प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीअंती पाच परवानाधारकांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

Web Title: The police have arrested the accused in a murder case in dharashiv taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
2

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
3

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का
4

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.