Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणच्या शिक्षिका हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहीती

एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या पार्किंग परिसरात आढळलेल्या कल्याण येथील शिक्षिका संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येचा छडा लावण्यात वाडीवहे पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 31, 2026 | 12:01 PM
कल्याणच्या शिक्षिका हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहीती

कल्याणच्या शिक्षिका हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी दिली धक्कादायक माहीती

Follow Us
Follow Us:

इगतपुरी :  राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या पार्किंग परिसरात आढळलेल्या कल्याण येथील शिक्षिका संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येचा छडा लावण्यात वाडीवहे पोलिसांना यश आले आहे. प्रेमसंबंध, मालमत्तेचा मोह आणि लग्नाच्या खोट्या आमिषातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या प्रकरणी मुख्य आरोपी दिगंबर भागुजी आव्हाड याच्यासह संतोष जाधव, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे या चौघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्याण येथील वेणूबाई आंबो पावसे विद्यालयात शिक्षिका असलेल्या संगीता चंदनशिवे या १४ जुलै रोजी घरातून निघाल्यानंतर परतल्या नव्हत्या. १६ जुलै रोजी एसएमबीटी कॉलेजच्या पार्किंगमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून तपास करत आरोपींना गजाआड केले.

हे सुद्धा वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! पत्नीची छेड काढल्याने मित्राचाच दगडाने ठेचून खून; एलसीबीकडून ४८ तासांत आरोपी जेरबंद

लग्नासाठी तगादा लावल्याने हत्या

मुख्य आरोपी दिगंबर आव्हाड याचे संगीता यांच्याशी २००४ पासून प्रेमसंबंध होते. संगीता लग्नासाठी तगादा लावत होत्या, तर आरोपीची नजर त्यांच्या नावावर असलेल्या तीन फ्लॅट्सवर होती. १५ जुलै रोजी लग्नाचे आमिष दाखवून आरोपींनी संगीता यांना कारने नाशिककडे आणले. एसएमबीटी परिसरातील पार्किंगमध्ये लग्नाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मुख्य आरोपी दिगंबर आव्हाड याने संगीता यांचा गळा आवळून खून केला. पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक महाजन, हवालदार विकास गिते, विनोद गोसावी आदी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण

घराच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन आलेल्या तरुणाला घरासमोरून वाहन नेत असल्याच्या कारणावरून अडवून त्याच्यासह त्याच्या आई- वडिलांना मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना २८ जुलै राजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बंबाटनगरात घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. छाया कदम, बालाजी कदम, अर्जुन कदम आणि अन्य एक अशी मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कल्पेश राजू सूर्यवंशी (वय २६, रा. बंबाटनगर, बीड बायपास) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: The police have arrested the accused in the case of the murder of a female teacher from kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

‘दृश्यम’ स्टाईल हत्या; पतीचा खून करून मृतदेह 12 फूट खोल खड्ड्यात पुरला
1

‘दृश्यम’ स्टाईल हत्या; पतीचा खून करून मृतदेह 12 फूट खोल खड्ड्यात पुरला

विक्रीसाठी आणलेली चार गावठी पिस्तुले जप्त, गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुणाला ठोकल्या बेड्या
2

विक्रीसाठी आणलेली चार गावठी पिस्तुले जप्त, गुन्हे शाखेची धडक कारवाई; तरुणाला ठोकल्या बेड्या

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे
3

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर
4

तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.