AI Summit : पंतप्रधान मोदी आज करणार शिखर परिषदेचे उद्घाटन; इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अनेक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी ९:४० वाजता भारत मंडपम येथे होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी ९:१५ वाजता शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या २० देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे आणि सरकार प्रमुखांचे स्वागत करतील.
पंतप्रधान मोदींचे भाषण सकाळी १०:२५ वाजता सुरू होईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह अनेक जागतिक नेते आणि उद्योगपती शिखर परिषदेत उपस्थित राहतील. दरम्यान, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा बुधवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. नवी दिल्लीत उतरल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिले, “नमस्ते, भारत! मी पुन्हा एकदा भारतात आलो आहे. माझा अजेंडा संबंध मजबूत करणे, भागीदारी वाढवणे आणि जगात एआयच्या भविष्यावर चर्चा करणे आहे.”
हेदेखील वाचा : ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट
दरम्यान, लूला यांच्या भेटीत तंत्रज्ञान, व्यापार आणि जागतिक प्रशासन यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. ते इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होणार असल्याने एआयवरही भर देतील. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील, अशीही माहिती सध्या दिली जात आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल
ग्लोबल साउथच्या विकासाठी भारत आणि ब्राझील (Brazil) भागीदारी अत्यंत महत्वाची मानली जाते. आज, बुधवारी (१८ फेब्रुवारी) ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लुला दा सिल्वा भारतात आयोजित AI Impact Summit 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आले आहे. त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या भेटीत लुला दा सिल्वा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेणार आहेत.
AI समिटमध्ये सहभागी होणार लुला दा सिल्वा
लुला दा सिल्वा मुंबईत भारत मंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या समिटचा उद्देश एआयच्या माध्यनातून ग्लोबल साउथमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इॅमन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीनंतर ब्राझीलच्या अध्यक्षांचा दौरा भारताचा जागतिक मंचावर प्रभाव वाढवत आहे.






