Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील पीएमपी बसमध्ये धक्कादायक प्रकार; चोरट्यांनी महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुण्यात पीएमपीएल बसप्रवासात चोरीच्या घटना घडल्या आहेत, याववरुन आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2025 | 12:49 PM
पुण्यातील पीएमपी बसमध्ये धक्कादायक प्रकार; चोरट्यांनी महिलांच्या दागिण्यांवर मारला डल्ला

पुण्यातील पीएमपी बसमध्ये धक्कादायक प्रकार; चोरट्यांनी महिलांच्या दागिण्यांवर मारला डल्ला

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पीएमपी बस प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मोरेबाग बसस्टॉप जवळ कात्रज ते अरण्येश्वर चौक सहकारनगर प्रवासादरम्यान ही चोरीची घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राहतात. शनिवारी त्या कामानिमित्त पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७५ हजारांचे सोन्याचे गंठण चोरून नेले. अरण्येश्वर चौकात बसमधून खाली उतरताना महिलेला गळ्यात सोन्याचे गंठण दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक फौजदार बी. के. खुटवड करीत आहेत.

महिलेच्या पर्सवर चोरट्यांचा डल्ला

निगडी ते पुणे स्टेशन असा बसप्रवास करणार्‍या ३३ वर्षीय महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी तब्बल १ लाख १७ हजार रूपयांचे दागिने चोरून नेले. दुपारी हा प्रकार घडला असून, याप्रकरणी महिलेने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. महिला तळवडे परिसरात राहते. कामाच्या निमित्ताने पीएमपी बसने प्रवास करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी त्यांच्या पर्सवर डल्ला मारला. पुणे स्टेशनवर उतल्यानंतर महिलेच्या लक्षात हा प्रकार आला. अधिक तपास उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करीत आहेत.

सोन्याची पाटली चोरली

स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकातून निगडीच्या दिशेने जाणार्‍या ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याच्या पाटलीवर डल्ला मारला आहे. ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली चोरून नेली आहे. याबाबत तक्रारदार ६६ वर्षीय जेष्ठ महिलेने खडकी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार बोपोडी येथे राहायला आहेत. त्या स्वारगेटला आल्या होत्या. नंतर घरी जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी गोंधळ केला. महिलेच्या हातातील सोन्याची पाटली काही सेंकदात कापून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक कस्पडे करीत आहेत.

Web Title: Thieves steal womens jewelry in pmp bus in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • cmomaharashtra
  • crime news
  • PMPML Bus
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
1

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
2

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
4

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.