Photo Credit- Social Media MPSC पेपर विक्री प्रकरणात तिघांना अटक, मध्यप्रदेश कनेक्शनही उघड
पुणे: एमपीएससी पेपर विक्री प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आणखी दोन जणांना अटक केली आहे. यातील एकाला महाराष्ट्रातून, तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून ताब्यात घेण्यात आले. यापूर्वीच पोलिसांनी तिघांना अटक केली होती, त्यामुळे या प्रकरणातील अटक झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
या टोळीने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधल्या रात्री प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्यांनी तब्बल 40 लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भातील फोन कॉलमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) रविवारी ( २ फेब्रुवारी) घेतल्या गेलेल्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परिक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत ४० लाखांची मागणीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांना अटक केली आहे. योगेश सुरेंद्र वाघमारेला (२७ वर्षे) याला भंडारा जिल्ह्यातून तर दीपक यशवंत साकरेला (२७ वर्षे) याला मध्यप्रदेशातील बालाघाटमधून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दाखवले होते.
योगेश आणि दीपक यांनी परीक्षेपुर्वी काही विद्यार्थ्यांना फोन करून प्रश्नपत्रिका पुरवण्याचे आमिष दिले होते. या फोनची कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती आरोपींनी फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत या दोघांना अटक केली आहे.
National Women Doctors Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्याचा उद्देश्य म्हणजे महिलां
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आलेल्या फोन कॉलमध्ये असे सांगण्यात आले की, “नमस्कार सर, मी रोहन कन्सल्टन्सी, नागपूरमधून बोलत आहे. आपल्या आधीच्या चर्चेनुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपल्याला उपलब्ध करून देऊ. त्यासाठी आपण व्हॉट्सअप कॉलद्वारे एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे पुढील प्रक्रिया होईल.” ही कॉल एका महिलेच्या आवाजात होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच प्रश्नपत्रिका मिळू शकते, या दाव्याने एमपीएससी परीक्षार्थींमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती.
रविवारी ( २ फेब्रुवारी) एमपीएससी गट ब (अराजपत्रीत) संयुक्त पुर्व परिक्षा सुरळीत पार पडली. मात्र, दोन दिवसांपासून या परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकेसह दिली जाईल. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील, असे कॉल रेकॉर्डींग सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुण्यातील एका विद्यार्थ्यालाही फोन आला होता. तसेच एमपीएससी आयोगाकडेही काही विद्यार्थ्यांनी यासंदंर्भात ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आयोगाने पुणे पोलिसांना तक्रार केली होती. पोलीस आयुक्त अमितेशकुमार व गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे यांनी गांर्भियाने दखल घेत तपासाच्या सूचना केल्या होत्या.