फोटो- istockphoto
अमरावती : अमरावतीतील तीन जणांची 6 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना गाडगेनगर, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या सर्व प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
हेदेखील वाचा : Shivani Duble Death : नागपूरच्या तरुणीचा पॅराग्लायडिंग अपघातात मृत्यू, अचानक दोर तुटल्याने 100 फुटांवर थेट जमिनीवर
शेअर मार्केट आणि ट्रेडिंगच्या नावाखाली शहरातील रहिवासी महिलेची 2.54 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 19 ऑक्टोबर 2024 ते जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. 22) फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी फायर्स ओटिस ट्रेडिंग कंपनी कस्टमर केअर आणि आरोही शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिलेने सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची जाहिरात पाहिली.
हफ्ता भरला, पण रक्कम कंपनीत भरलीच नाही
गाडगेनगर पोलिस स्टेशन परिसरात राहणाऱ्या महिलेने 11 मार्च 2023 रोजी टीव्हीएस शोरूममधून वाहन घेतले होते. दरम्यान, थकीत हप्त्याचे 70 हजार रुपये एकाच वेळी भरण्यासाठी त्यांनी आरोपी चेतन अनंतराव लहाने (वय 27, रा. सिंदी बुद्रुक, अचलपूर) याला गुगल पेवर ऑनलाईन पैसे पाठवले. मात्र, आरोपीने ही रक्कम कंपनीत जमा न करता स्वतःकडे ठेवली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यानंतर महिलेच्या फोनवर एक मेसेज आला. ज्यामध्ये गुंतवणुकीवर चांगला नफा मिळण्याबाबत सांगितले गेले. त्यावर महिलेने कंपनीत वेळोवेळी 2 लाख 54 हजार 548 रुपये गुंतविले.
क्रेडिट कार्डची माहिती घेऊन 3.26 लाखांचा गंडा
स्थानिक मनोहर अभिमान वासनकर (वय 64) यांनी क्रेडिट कार्ड काढण्यासाठी सोशल मीडियावर जाहिरात पाहिली. त्यावरून त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित व्यक्तीने क्रेडिट कार्ड कस्टमर केअरशी बोलण्यास सांगून खात्याची माहिती घेतली आणि त्यांच्या खात्यातून 3 लाख 26 हजार 500 रुपये परस्पर काढून घेतले.
हेदेखील वाचा : Mahakumbh fire case : कुंभमेळ्यामध्ये आग लागली नाही तर लावली…; ‘या’ खालिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी