फोटो सौजन्य: iStock
बदलत्या काळानुसार लोकांची लाइफस्टाइल सुद्धा बदलत आहे. आज शहरात प्रत्येक विकेंडला पार्टी होत असतात आणि पार्टी म्हंटलं की दारू आणि सिगारेट आलीच. अनेकदा आपण जाहिरातनमधून बघत असतो की दारू पिणे किंवा सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते.
लोक अनेकदा मजा म्हणून, ताण कमी करण्यासाठी किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी नशायुक्त गोष्टींचा वापर करतात. पण सत्य हे आहे की प्रत्येक प्रकारचे व्यसन शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागाला हानी पोहोचवत असते. फरक एवढाच आहे की काही व्यसनांचा परिणाम हळूहळू होतो तर काहींचा परिणाम खूप लवकर होतो. दारू, सिगारेट आणि भांग, तिन्हीही शरीराचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करतात, परंतु यापैकी कोणचा परिणाम सर्वात घातक आणि दीर्घकाळ टिकणारा असतो?
तज्ञ स्पष्ट करतात की कोणत्याही स्वरूपात व्यसन शरीर आणि मन दोघांसाठी धोकादायक असते, परंतु यापैकी कोणते व्यसन शरीराला सर्वात जलद आणि सर्वात गंभीरपणे नुकसान करते हे आज आपण जाणून घेऊयात.
लिव्हर डॅमेज: अल्कोहोलचा थेट परिणाम लिव्हरवर होत असतो. यामुळे फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस सारखे आजार होतात.
मेंदूवर परिणाम: जास्त काळ अल्कोहोल प्यायल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.
हार्ट हेल्थ बिघडते: जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
फुफ्फुसांचा शत्रू: सिगारेट ओढल्याने फुफ्फुसांचा कर्करोग, क्रॉनिक ब्राँकायटिस, दमा असे गंभीर आजार होऊ शकतात.
ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम: निकोटीन रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती: सिगारेट ओढणाऱ्यांची त्वचा लवकर वयस्कर होऊ लागते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होते.
मेंदूच्या कार्यावर परिणाम: भांगच्या नशेचा स्मरणशक्ती, लक्ष आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
मानसिक आरोग्य: भांगचे दीर्घकाळ सेवन केल्याने चिंता, नैराश्य आणि मानसिक गोंधळ होऊ शकतो.
शरीरावर मंद परिणाम: भांगचा परिणाम तात्काळ कमी प्राणघातक असतो, परंतु त्यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर नुकसान होऊ शकते.
सिगारेटमधील निकोटीन फुफ्फुस व हृदयाला जलद गतीने आणि कायमस्वरूपी हानी पोहोचवतात.
दारू यकृत आणि हृदयासाठी अतिशय घातक असली तरी, काही प्रसंगी याचे व्यसन नियंत्रणात आणता येते.
भांग मानसिक आरोग्यावर जास्त प्रभाव टाकते, मात्र ती सिगारेट व दारूप्रमाणे तात्काळ शारीरिक हानी करत नाही.
सर्वात धोकादायक व्यसन सिगारेटचे मानले जाते, कारण प्रत्येक झुरक्याने संपूर्ण शरीरात विष पसरते. हे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा प्रमुख कारण ठरते.