एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका भाड्याच्या खोलीचे कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मृत महिलेचं नाव अंगुरी (वय 28) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगुरी ही ७ महिन्यांची गर्भवती होती. लिव्ह इन पार्टनरसोबत पैश्यांवरून वाद झाल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेने सगळ्यांचे मन हेलावून टाकणारी घटना आहे.
कशी केली हत्या?
या हत्याप्रकरणात अंगुरीचा लिव्ह इन पार्टनर अनुज (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. अनुजने पोलिसांना सांगितले की, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचे अंगुरीसोबत आर्थिक व्यवहावरून वाद निर्माण झाला. हा वाद एवढा टोकावर गेला की रागाच्या भरात अंगुरीचा गळा दाबून हत्या केली. त्याने अंगुरीचा गळा दोन्ही हातांनी धरला आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने अनुज भयभीत झाला आणि खोली बंद करून तो त्या ठिकाणाहून पळून गेला.
पोलिसांनी या हत्येचा तपास केला. फरार अनुज (वय 30) याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीत हत्येची कबुली दिली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.
अंगूरीचे झाले होते दोन विवाह
अनुजने चौकशीत अनेक गोष्टींचा खुलासा देखील केला आहे. अंगूरीने सुरुवातीला २०२३ मध्ये मोहम्मद सदरुद्दीनशी विवाह केला होता. त्यानंतर ती लवकरच त्याच्यापासून वेगळी झाली. नंतर २०२४ मध्ये विशालसोबत कोर्ट मॅरेज केला. तीच विशालसोबत देखील फार काळ टिकले नाही. याच काळात आरोपी अनुजच्या संपर्कातच होती. त्यानंतर तो तिच्या भाड्याच्या खोलीत येऊ लागला होता. अनुजचे आणि आरोपीचे अनेकदा संबंध देखील निर्माण झाले होते.
यामुळे अंगूरीची गर्भधारणा झाली. गर्भधारणेनंतर अंगुरीने अनुजवर पैशासाठी दबाव आणला होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागला होता. आणि याच वादाचं रूपांतर हत्येत झाला.
Ans: अनुज
Ans: सात
Ans: खोलीत
Ans:






