Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Crime: पिस्तुलातून गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना 24 तासांत बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

कराड तालुक्यातील पेरले येथे पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या दोन सराईत गुंडांना सातारा एलसीबी आणि उंब्रज पोलिसांनी २४ तासांत अहिल्यानगर येथून अटक केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 19, 2026 | 07:04 PM
पिस्तुलातून गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना 24 तासांत बेड्या

पिस्तुलातून गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना 24 तासांत बेड्या

Follow Us
Follow Us:
  • पिस्तुलातून गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना 24 तासांत बेड्या
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • वाचा सविस्तर बातमी!
उंब्रज, दि. 19: कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीत इंदोली पुलाजवळ पिस्तुलातून गोळीबार करून एका तरुणाला गंभीर जखमी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि उंब्रज पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अहिल्यानगर येथून अटक करत धडाकेबाज कारवाई केली.

शुक्रवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास पैशाच्या व्यवहाराचा वाद मिटविण्याच्या बहाण्याने संतोष शंकर घोलप (वय 37, रा. कालगाव) यांना पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळ बोलावण्यात आले. तेथे आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव) व त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर) यांनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकावून सोमनाथ चव्हाण याने फॉर्च्युनरमधून पिस्तूल काढत जीवे मारण्याच्या उद्देशाने सलग दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना त्या फिर्यादीच्या दोन्ही पायांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.

16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा, दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल लाखोंचे दागिने जप्त

तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अहिल्यानगर येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकाने तत्काळ अहिल्यानगर गाठून कायनेटीक चौक परिसरातील साई सूर्य हॉटेल येथे सापळा रचला. तेथे लपून बसलेल्या दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून फरार झालेल्या पोलीस अभिलेखावरील आरोपींना अवघ्या 24 तासांत गजाआड करण्यात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या जलद आणि अचूक तपासाचे कौतुक होत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

सासवड पोलिसांची मोठी कारवाई, गाई अन् म्हशी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Web Title: Two men arrested within 24 hours after fleeing the scene of a pistol shooting swift and bold action by the local crime branch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • crime news
  • Karad Crime
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.